आरोग्य धनसंपदा आजीबाईचा बटवा
सर ! मी सौ . चित्राताई देशपांडे . संभाजीनगर.
विषय - बाळंतिणीला आहार कसा द्यावा ?
विषय खरोखर छान आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
खरं म्हणजे... बाळंतपण हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो. बाळ जन्मल्यानंतर एका दिवसात एक मुलगी म्हणजे स्रि ही बाळाची आई होते आईला तिचे आई पण निभवायचे असते. याची कल्पना तिला आपल्या सासू आई किंवा माहेरच्या स्वतःच्या आईकडून वा मैत्रिणीकडून थोडीफार मिळालेली असते पण प्रत्यक्षात काही तासात पहिल्या काही दिवसात तिला स्वतःचा अनुभव मिळतो तो एक जीवनातला मोठा क्षणीक अत्यानंद असतो . यावेळी तिचा खरोखर पुनर्जन्म असतो. यात ती जीवनाचं तिचं कर्तव्य निभवत असते आणि जगाला मातृत्व देण्याचा अधिकार मला आहे असं तिच्या आनंदात ती व्यक्त करत असते. स्त्रीला आई पण होणं हे अतिशय कष्टदायक. कठीण. उत्साह वर्धक असते. मातृत्व हे एक जीवनातील टर्निंग पॉईंट असतो. त्यामुळे स्रिला मान .सन्मान .आदर आणि प्रौढत्व मिळून आत्मिक समाधान मिळते. हा खरा आनंद तिला मिळत असतो.
बाळंतपण कोणत्या पद्धतीने झालं. हे महत्त्वाचं असतं. कारण आज-काल बाळंतपणाच्या पद्धती बदललेल्या आहेत.
१) नैसर्गिक प्रसूती -- निसर्ग नियमा प्रमाणे स्रिला लग्नानंतर काही दिवसांनी नियमित येणारी मासिक पाळी अचानक गर्भ गर्भाशयात आल्यानंतर पाळी बंद होते. म्हणजे गर्भाशयात स्रीबिजवाहिनीद्वारे शुक्रजंतू ची वाढ होते. मग बाळाला गर्भाशयातून बाहेर येण्यासाठी सर्वसाधारण निसर्गनियमाप्रमाणे नऊ महिने नऊ दिवसाचा काळ बाळाची वाढ होण्यासाठी लागतो. तो परिपूर्ण होऊन आईसह बाळाला स्वतः वेदना सहन करून रडता रडता जन्माला येत असतो. अशावेळी स्त्रीला आणि येणाऱ्या बाळाला त्रास होतो पण याच त्रासातून आई लवकरच आनंदाने बरी होते आणि समजा बाळाचं वजन थोडं जास्त असेल किंवा बाळाला प्रसुती दरम्यान जास्त वेळ लागला तर नैसर्गिक प्रसूतीमध्ये आईला काही वेळा मुखमार्गाजवळ टाके द्यावे लागतात पहिले काही दिवस तिच्यासाठी या वेदना असतात . त्या औषधी डॉक्टरच्या सल्ल्याने देऊन जखमा वेदना कमी होतात.पण नैसर्गिक परिस्थितीत मग तिला कोणताही त्रास होत नसतो.
२) सिझेरियन सेक्शन... प्रसूती दरम्यान बऱ्याच वेळा आईला गर्भधारणासाठी नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होऊन नैसर्गिक प्रसूती होत नसल्यास अर्थात गर्भाशयात बाळाचे वजन जास्त किंवा बाळ गर्भाशयात आडवे तिरपे नाहीतर बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकल्यास प्रसूतीच्या वेळीवेळी
कळ वेदना होऊनही सर्वसाधारण प्रसूती होत नसल्यास... बराच वेळा श्रीरोग तज्ञाच्या सल्ल्यानुसार आईच्या पोटावर छेद घेऊन बाळाला बाहेर काढले जाते . त्यासाठी सिझेरियन सेक्शन करून आईला पोटावर टाके घ्यावे लागतात त्या वेदना काही दिवस होतात. थोडी काळजी घेऊन औषधे देऊन तब्येत आपोआप निरोगी होते. सिझेरियन सेक्शन करणे महत्त्वाचे असते.
३) शारीरिक वेदना -- सर्वसाधारण प्रत्येक स्त्रीला प्रसुती समयी कळा येणाऱ्या वेदना होतात. आज-काल मोठ्या हॉस्पिटलमध्ये किंवा जिल्हा परिषद रुग्णालयात वेदना रहित प्रसूती होऊन आईला कोणताही त्रास होत नाही. व बाळ निरोगी जन्माला येते. कधी कधी आईला पाठीच्या मणक्यात एक भूल देण्याचे इंजेक्शन देऊन मग सलाईन मध्ये काही प्रसूती च्या कळा निर्माण करणारी इंजेक्शन देऊन बाळाला जन्म दिला जातो.
कधीकधी बाळ - बाळंतीण हॉस्पिटल मधून घरी आल्यावर आईला पाठ दुखणे. थोडाफार रक्त साव होणे. हात पाय दुखणे अशक्तपणा वाटतो. कधी बाळाला दुधाचे स्तनपान करताना स्तनात गाठी निर्माण होतात. त्या दुखतात सट सट करतात वेदना होतात काखेत ओळांबा येतो म्हणजे गाठ येते अशावेळी आपल्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करून बरे वाटते. कधी अशावेळी आई स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करते त्यामुळे बाळाचे पोट भरत नाही बाळाची शी आणि सु व्यवस्थित होत नाही दोघांनाही थोडा त्रास होतो. याला शारीरिक त्रास असे म्हणतात.
४) भावनिक एकटे पण --- प्रत्येक बाळंतीण च बाळ जन्मल्यानंतर काही दिवसांनी त्या आईला भावनिक मानसिक एकटेपणाचा त्रास होतो. अशावेळी बाळ रडते कधी हसते. त्यात भावनिक आजार आपोआप कमी होतात पण आईला प्रथमता कळत नाही बाळाला कधी पाजावे कसे पाजावे हे लवकर समजत नाही याला प्युपेरिअल ब्लूज किंवा बेबी ब्लू असे म्हणतात. या काळात तिच्याजवळ असलेल्या बाळाकडे बघून ती रडते कारण सासरची वा नवऱ्याची आठवण तिला येते खरंतर आई होणं हे आनंदाची गोष्ट असते. कारण अचानक पोटातील नऊ महिने परिपूर्ण झाल्यानंतर सर्वांचं लक्ष तिच्या प्रसूतीकडे असते. पण एकदा बाळ जन्माला आल्यानंतर तिच्याकडे थोडं सर्वांचं दुर्लक्ष होतं असं तिला सतत वाटते आणि बाळाची जबाबदारी तिच्याकडे येते हा खरा शरीरातील हार्मोनियल बदल तिला जाणवत असतो त्यामुळे ती भावनिक दृष्ट्या एकटी वाटते. सतत विचार करते. याला भावनिक एकटे पण असे म्हणतात.
बाळंतनीचा आहार कसा असावा
प्रसूतीनंतर आईची झालेली शारीरिक झीज मानसिक झीज भरून काढण्यासाठी तिला सात्विक समतोल चौरस आहार द्यावा. प्रथमतः साजूक तुपातील गुळ मिश्रण करून त्यात काजू बदाम खारीक याची फोड थोडसं दूध मिश्रण करून पातळ शिरा रोज सकाळी काही दिवस तरी द्यावा. नाश्त्याला डिंकाचे लाडू. दूध तुपाचे खीर. पातळ दाळीमिस्रित गुळाचा शिराही द्यावा. दुपारच्या जेवणात शेपू .पालक .पोकळा माठ. हिरवी पालेभाजी पातळ करून त्यात ज्वारीची भाकर अथवा मऊ साजूक तुपाची पोळीचा काला. एकत्र करून द्यावा नियमित पाणी भरपूर प्यावे. सकाळी तोंड धुतल्या वरती दोन ग्लास पाणी आणि रात्री झोपताना एक ग्लास पाणी जेवताना अडीच अडीच तांबे पाणी मध्ये मध्ये पाणीही प्यावे म्हणजे बाळाला लागणारे पोषक सत्व आईच्या दुधात निर्माण होतात. आईचं दूध याचं विशिष्ट गुरुत्व वाढलं म्हणजे बाळाला अपचन होते त्याला अपचन होते. मग जुलाब उलटी बाळाला सुरू होते. बाळ रिरी करते शांत झोपत नाही पोटात मोडशी तयार होते.
स्त्री रोग तज्ञ नेहमी बाळंतनीला सात्विक आणि समतोल आहार द्यायला सांगतात. त्यामध्ये दूध.तुप.अडी. हिरवे पालेभाजी यांची पातळ भाजी कडधान्य कधी सफरचंद चिकू पपई. इतर कडधान्य. पातळ भाजी काला मोडून खावी. सकाळी रोज स्वच्छ गरम कोमट पाण्याने अंघोळ करून पातळ गुळाचा शिरा काही फळ घेऊन एक तास आराम करावा. दुपारी नेहमीप्रमाणे कोणत्याही पातळ भाजी मध्ये काला म्हणून भरपूर जेवण करावे. त्यानंतर आराम एक ते दीड तास करावा. घरात थोडे फिरावे. पावली करावी. जेवणानंतर लगेच झोपू नये बाळाशी गप्पा माराव्यात. हसावे. बोलावे. बाळाचे आरोग्य विषयी आणि संस्काराविषयी पुस्तक वाचावी किंवा टीव्हीवरील संस्कार शील कार्यक्रम विनोदी कार्यक्रम बघावे.
स्तनपान करणाऱ्या महिलांना पहिले सहा महिने रोजच्या जेवणात 16 ग्रॅम प्रथिने त्यानंतर पुढच्या तीन महिन्यात रोज 11 ग्रॅम प्रथिनांची गरज असते. कडधान्य, सुकामेवा, फळफळावरे खावीत.
बाळाला पाजल्यानंतर प्रत्येक वेळी छातीशी धरून पाठीवरून खाली पाच ते आठ वेळा हात फिरवावा त्यामुळे पाजलेल्या दुधाचे पचन होते. जर आपण स्तनपान केल्यानंतर बाळाला पाळण्यात टाकले तर बाळा आपोआप उलटी करते त्याला दूध पचत नाही त्याला ती सवय लागते त्यासाठी बाळाच्या पाठीवरून पाजल्यावरती हात फिरवावा.
प्रथिने.... संपूर्ण पालेभाजी दूधजन्य पदार्थ कडधान्य डाळी शिरा बदाम काजू गावरान तुपाचा
लोह..... गुळाचा शिरा नाश्त्याला अथवा थोडं खजूर किंवा खारी क मिश्रित केलेला शिरा नाष्टा द्यावा
कॅल्शियम..... हिरवे पालेभाजी काकडी. फ्रुट सॅलड पपई सफरचंद चिकू डाळिंब ज्यूस चालेल
फायबर युक्त पदार्थ...... फळे दाळीसाळी चालतील.
जीवनसत्व.... दूध .दुधाचे पदार्थ .सुका मेव्याचे लाडू .शिरा. सफरचंद .चिकू चालेल.
बाळंतीने काय खाऊ नये........
जंक फूड..... पिझ्झा बर्गर पाणीपुरी समोसा फरसाण दहीवडा उसळ आती मसालेदार काळा मसाल्याची भाजी आंब्याचा रस कारली गवार वांगी खाऊ नये. अति गरमागरम अति थंड पदार्थ फ्रिजचे पदार्थ हाय स्क्रीन लस्सी श्रीखंड बंद करावे बाळ एक ते दीड वर्षापर्यंत हे वरील पदार्थ खाऊ नये.
आईने कधीही अल्कोहोल धूम्रपान करू नये.
बाळंतपणात आपण कोणती काळजी घ्यावी.?
प्रसूतीनंतर काही दिवस आपण सकाळी उठल्यावर पाणी भरपूर प्यावे आंघोळीनंतर गरमागरम शिरा गुळाचा पातळ करून खावा त्यात सर्व सुकामेवा व गावराणी तुपातील घ्यावा.
शरीराला पुरेसे पोषण होण्यासाठी घरात शतपावली करावी हीरावे सारखे झोपून राहू नये दुपारी एक ते दीड तास आराम करावा रात्री टीव्ही जास्त बघू नये मोबाईल शक्यतो हातात घेऊ नये रोज रात्री दहा वाजता कोणताही मनात विचार न करता झोपावे, सकाळी सात वाजता साडेसात पर्यंत उठावे. आपण नेहमीच हसत खेळत गप्पा माराव्यात भरपूर बोलावे भरपूर असावे तेच संस्कार आपल्या नाजूक छकुला बाळावर पडतील कारण बाळाला भावी आयुष्यात चांगले संस्कार देणारी व्यक्ती प्रथमतः आई असते.
आईने स्वतःची काळजी घेऊन बाळाची काळजी घ्यावी
Tags:
आरोग्य