के. व्ही. पेंढारकर कॉलेजमधील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोकण विभागाचे शिक्षक आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट घेतली.
कॉलेज अनुदानित असताना ते विनाअनुदानित करण्याचा घाट व्यवस्थानाने घातला. प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काम न देता एका वर्गात ४ जून २०२४ पासून बसवून ठेवले. व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी प्राध्यापक, विद्यार्थी एकवटले होते. त्यांनी बेमुदत साखळी उपोषण आणि सेव्ह पेंढरकर कॉलेज मोहीम सुरू केली. या आंदोलनास पहिल्याच दिवशी आ. म्हात्रे यांनी भेट घेऊन त्याची दखल घेतली होती. या सगळ्या प्रदीर्घ लढ्यानंतर राज्य सरकारने कॉलेजवर प्रशासकाची नियुक्ती केली. म्हात्रे यांची प्राध्यापकांनी भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
Tags:
शैक्षणिक