आरोग्य धनसंपदा सदरातील आजीबाईचा बटवा
सचिन जोशी. विलेपार्ले. मुंबई... सर या रविवारी ब्रह्मांड या विषयावर माहिती द्यावी.
विषय - ब्रह्मांड म्हणजे काय ?
हा विषय आरोग्य च्या समस्या मध्ये येत नाही ?
सर्वसामान्य माहिती आपणास असावी यासाठी मी दोन शब्द लिहीत आहे.
ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण आकाश त्यातील असलेल्या सर्व वस्तू उदाहरणार्थ पृथ्वी. ग्रह .तारे .आकाशगंगा.ऊर्जा असे -- इतर नैसर्गिक घटक आणि विविध प्रकारचे निर्माण होणारे पदार्थ याचा समावेश ब्रह्मांडामध्ये येतो. ब्रह्मांडामध्ये सर्व विश्व त्यातील घटना याचा प्रामुख्याने विचार येतात . आपण सर्व अर्थात तुम्ही सुद्धा या विश्वातील ब्रम्हांडाचा एक भाग आहेत . हे सर्व ब्रह्मांड ब्रह्मदेवाने निर्माण केले म्हणून या संपूर्ण विश्वाला ब्रह्मांड असेही म्हणतात . भागवत गीतेमधील काही श्लोक विश्वाची निर्मिती कशी झाली . याची सखोल माहिती देतात. आपण एखाद्या वेळी महासागराच्या किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर उभे आहोत आणि समुद्राच्या लाटा च्या मागे आकाश नेहमीच अत्ती दूर अंतरापर्यंत टेकल्यासारखे वाटते. ही विश्वरचना आहे. हे ब्रह्मांड हजारो इसवी सनापूर्वी निर्माण झाल्या असावे. या ब्रम्हांडात पृथ्वीप्रमाणे आणखी इतर ठिकाणी कुठे मानव वस्ती . सजीव लोकाची वस्ती आहे काय ? याचाही शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. ब्रह्मांड म्हणजे विश्वरचना आहे. ही कोणी ? कधी ? कशी निर्माण केली. हे आजपर्यंत जगात कोणालाही माहिती नाही.
ब्रम्हांडा मध्ये देवाची निर्मिती कोणी केली" ?
हे आजपर्यंत अनुत्तरीत आहे आणि कदाचित पूर्ण आत्म साक्षात्कार आपणास झाला तर याचे उत्तर आपणास मिळू शकेल . आता आपण फक्त एवढेच म्हणू शकतो की देव हा नेहमीच होता आणि आहे त्याची उपस्थिती आपल्याबरोबर नेहमी असते तो त्याच्या हवेत स्वरूपात तसाच आपल्याबरोबर सतत फिरत आपला विश्वाचा व्यास 93 अब्ज प्रकाश वर्ष आहे. अवकाशाचा शोध प्रामुख्याने खगोलशास्त्रज्ञांनी दुर्बिन वापरून केला अवकाशात विश्वामध्ये अंदाजे दोन ट्रिलियन आकाशगंगा असून तारे १०: २४ मिलियन शेकडो पेक्षा जास्त आहे.
ब्रह्मांडामध्ये प्रथम कोणता देव आला ?
हिंदू धर्मातील निर्माता . पालक आणि संहारक या त्रिकोणात भगवान ब्रह्मा यांनी उत्पत्ती केली .म्हणून त्यांना निर्माता देव असे आपण म्हणतो .तेच खरे विश्वाचे पिता आहेत .पण शास्त्रानुसार सृष्टीच्या सुरुवातीला भगवान ब्रह्माचा जन्म हा विष्णूच्या मागे तुन झाला .असे म्हणतात .विश्वाचा 90% भाग हायड्रोजनचा वाटा आहे .तो भौगोलिक जगाच्या जीवनासाठी फार आवश्यक आहे. पदार्थ आणि ऊर्जा हे संपूर्ण विश्वाचे दोन मूलभूत घटक आहेत आधी शास्त्रज्ञासमोर एक मोठे आव्हान आहे .की विश्वातील बहुतेक पदार्थ अदृश्य आहे आणि बहुतेक ऊर्जेच्या स्रोतही त्यांना समजला नाही. शतकान व शतके मानवाला विश्वाच्या रचनेचे रहस्य अद्यापही समजले नाही .ते मात्र शिकण्याचे आकर्षण मानवाला आहे ..ज्यामुळे त्यांना आपल्या ग्रहाच्या पलीकडे जाऊन निर्माण होणारी सौर ऊर्जेचा पलीकडे अज्ञात वातावरणाचा शोध लावता येईल. हे केवळ कुत्वलाच्या पलीकडे आहे आपण फक्त जमिनीवर उभे राहून दुर्बिणीद्वारे आकाशगंगेचा तपशील पाहू शकतो .त्यात फक्त लांब स्टार अरे बोला सारख्या धूळ आणि वायूच्या चमकणारा ढगांचा समावेश त्यात आहे.
ब्रम्हांडाच्या सौर मंडळाची माहिती ?
आपल्या ब्रह्मांडामध्ये आकाशातील सौरमालेत आपले तारे सूर्य चंद्र हे गुरुत्वाकर्षणाद्वारे जोडलेले आहेत . त्यात ग्रह बुध. शुक्र. पृथ्वी. मंगळ .गुरु .शनि.प्लेटोनस. आणि नेपच्यून सह प्लेटो असून लाखो उल्कापिंड .धूमकेतू .व लघुग्रह हे सर्व गुरुत्वाकर्षणाद्वारे जोडलेले आहेत. पृथ्वीच्या समोर एक समर्पित भुजावर आकाशगंगा स्थिर आहे केंद्रापासून अर्ध्यावर आणि सौर ऊर्जेला आकाशगंगाभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास सुमारे 24 कोटी वर्ष लागतात. शास्त्रज्ञांनी आकाशगंगेचे चार मुख्य प्रकारात विभाजन केले आहे.
लंब वर्तुळाकार. सरपील. विशिष्ट. आणि अनियमित.
ब्रह्मांड आणि विश्व हे समानार्थी शब्द आहेत .ब्रह्मांड हा शब्द कमी वापरला जातो . पण विश्व हा शब्द जास्त प्रचलित असतो. अस्तित्वात असलेले सर्व काही गोष्टींचा विश्वास समावेश होतो. विश्वाच्या बाहेर काहीच नाही .जे आहे ते फक्त ब्रह्मांडात आहे. ब्रम्हांडाचा शेवट कधीच होऊ शकत नाही .कारण ब्रह्मांडाची कल्पना आपण इतक्या वेगाने करतो त्या कल्पनेच्या हजारो पट वेगाने ब्रम्हांडाचा विस्तार होत आहे. जीव आणि अजीव या दोन घटकापासून सृष्टीचे सर्जन होते. यातील जड आणि दृश्य घटक म्हणजे अजिब आहे. ब्रम्हांडाची रचना फार अगाध आहे. जीवसृष्टीमध्ये माणूस जन्माला येतो पण त्याला आयुष्यात एकदा तरी मरण आहे. ही ब्रम्हांडाची कल्पना आहे. त्याने निर्माण केलेली रचना म्हणजेच माणसाचे आयुष्य आहे. या आयुष्यात माणसाला मनन. चिंतन. अध्यात्म. संसार. पुनरुत्पादन. आणि स्वतःचं कर्म आणि कर्तव्य हे अति योग्य निबंध ब्रह्मांडाच्या बाहेर 80 / 90 वर्षांनी या वयाचे आहे. ही एक विश्वरचना आहे. जन्म आणि मृत्यू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विश्वर रचनेमध्ये आपण नेहमी सकारात्मक जीवन जगून आपले वयाप्रमाणे कर्तव्य निभावून संसाररूपी मोह पाशातून हे ब्रम्हांड सोडावयाचे आहे.
काळ आणि वेळ यात फरक कोणता ?
या दोघांमध्ये काही फरक नाही. दोन्ही वेळच्या संकल्पना या मनातल्या आहेत ही वेळ एक तर दिवस किंवा एक तर रात्रीची असते आणि तो काळ सुद्धा रात्र किंवा दिवसाचा असतो काळ हा पूर्ण आंबा आहे असे गृहीत धरले तर वेळ म्हणजे त्याच्या छोट्या छोट्या फोडी आहेत त्या सेकंदात मिनिटात मोजता येतात. घटना घडते त्याला भूतकाळ म्हणतात. चालू स्थितीच्या काळाच्या वेळेला वर्तमान काळ म्हणतात. आणि जीवनातील निर्माण होणाऱ्या काळातील वेळेला भविष्यकाळ म्हणतात. हे विश्व निर्मिती आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वेळेप्रमाणे काळ दिला असतो. ब्रह्मांडामध्ये बाळाचा जन्म झाल्यावर पाचव्या दिवशी सटवी माता गरोदर बाईच्या बाजे खाली एक कागद पेन हळदीकुंकू सह बोराटी वनस्पती. समईचा दिवा ठेवून पुजली जाते. त्याच दिवशी त्या बाळाची जन्म मृत्यू सा मधील काळ हा सटवी माता
लिहून जाते. घटना आयुष्यात त्याचप्रमाणे करतात याला जीवन असे नाव आहे. हे ब्रह्मांडामध्ये जे लिहिले असेल तेच होत असते त्यामुळे काळ आणि वेळ यात फारसा फरक नाही. यामध्ये फक्त संस्कार संस्कृती समाधान या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही एक विश्वरचना आहे. माणसाने जीवनात समाधानी आनंदी जीवन जगणे महत्त्वाचे आहे.
भगवान आणि ईश्वर यामध्ये कोणता फरक आहे
भगवान आणि ईश्वर यामध्ये कोणताही फरक नाही. दोघांचा अर्थ एकच आहे. फक्त भगवान/ उपरवाला हे शब्द हिंदी भाषेत प्रचलित आहेत. आणि मराठीमध्ये ईश्वर .देव. परमेश्वर आणि प्रभू हे शब्द म्हणता येतात. ईश्वराची व्याप्ती फार मोठी आहे. जगात देव आहे त्यामुळे आपण आहोत. प्रसादामध्ये कधी साखर आपणास दिसत नाही. तसेच देव सृष्टीमध्ये आपणास कधी दिसत नाही. तोच आपणास संस्कार. वळण. विचार आचार पदोपदी देत असतो. व्यक्ती जसा जसा मोठा होतो. तसा मोठा झाल्यावर तो परमेश्वराला विसरतो .म्हातारपणामध्ये यातना होताना. देवाची प्रार्थना करतो. कधीही मंदिरात न जाणारा माणूस देवाकडे मागणी करतो .मला आता या ब्रह्मांडातून यम पाठवून दे .मला आता जीवन जगणे नकोसे झाले .कारण मी आयुष्यात जे करायला पाहिजे होते .हे केले नाही .आता मात्र पश्चाताप होतो. या विश्वाच्या बाहेर मला घेऊन चल. मला या मरण यातना नको पाहिजे . मी कंटाळलो मग आपण भगवान ईश्वर याची आराधना करतो. या दोघांमध्ये फरक काही नाही.
आयुष्य आणि जीवन यामध्ये फरक कोणता ?
जीवन आणि मृत्यू या दोन घटनांच्या मधील कालावधीला आयुष्य म्हणतात .प्राणी .माणूस किंवा झाडेझुडपांना एक ठराविक विशिष्ट आयुष्य आहे .ज्यामध्ये शरीर एक विशिष्ट नावाने ओळखतात. तो कालावधी संपला की आयुष्य संपते.
जीवन म्हणजे जीवनाची व्याख्या ही फार मोठी आहे. या पृथ्वीवर जीवनाचे एक चैतन्य आहे .नवीनविन भावना आहेत .त्याला जीवन म्हणतात जीवन हे अमर्याद आहे ती एक जाणीव आहे .जन्म आणि मृत्यू तिला आपण बघू शकत नाही .सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होणे हे खरै जीवनाचे कर्तव्य आहे .जीवनाचा काहीसा अंश म्हणजे आयुष्य आहे. हीच एक ब्रम्हांडाची संकल्पना आहे. या ब्रह्मांडामध्ये सर्व देव. महात्मे . राजे .राण्या. संत.. महासंत... येऊन आपणास जीवन कसे जगावे .याचे तत्व शिकवून गेले. पण आपण फक्त महाभारत. गीता. रामायण .धार्मिक ग्रंथ वाचतो आणि नेहमी ऐकतो. पण अवलोकन करत नाही .हे मानवी जीवनाचे दुर्दैव आहे.... विश्वातील ब्रह्मांडामध्ये फार मोठे तत्व आहे. ते समजणे / समजून घेणे . महत्त्वाचे ते आपल्याला जन्मोजन्मी मिळाले तरी समजणार नाही.
आपणच जीवनात आपल्या पायावर दगड पाडून घेतो. आणि एखाद्या घटनेला /आजाराला सामोरे जातो .वास्तविक काखेत कळसा गावाला वळसा ...अशी आपली नीती आहे. जीवनात आपणास सुख समाधान पाहिजे. असेल तर ब्रह्मांड विश्व साधुसंत महात्मे यांचे विचार ऐकून स्वतः वागण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक जीवन जगा. भरपूर बोला. भरपूर हसा. सत्वगुणी पदार्थ खा. तमोगुण टाळा. मधुरा हास्य करा. एकमेकांना जवळ करा. संस्कार आणि नीतिमत्ता यांचं पालन करा. स्वतःचा अहंपणा विसरा. व्यसनाच्या मागे लागू नका. सत्कर्म करा. दुसऱ्याच्या दुःखात आपण सहभागी व्हा. हे ब्रम्हांडाचे नियम आहेत हे आपण जीवन जगेपर्यंत अमलात आणा. म्हणजे विश्वातील खरे ब्रह्मांड आपणास समजेल.
Tags:
आरोग्य