आरोग्य धनसंपदा आजीबाईचा बटवा
नामदेव विठ्ठल शिंपी. वय ६२ वर्ष. मंगळवेढा . सोलापूर सर... आता पावसाळा सुरू होतो आहे. तर या रविवारी निसर्ग आणि आरोग्य याविषयी थोडी माहिती द्यावी.
विषय - निसर्ग ( हरियाली ) आणि आरोग्य.....
आपण... निसर्गाच्या सानिध्यात आणि त्यातील वातावरणात आपला वेळ घालवला तर आपणास शारीरिक आणि मानसिक फायदे भरपूर मिळतात. जीवनात निसर्ग आणि आरोग्य यांचा फार जवळचा संबंध आहे . माणसाला निसर्गापासून संरक्षण मिळते. मानवी आरोग्यासाठी त्यातील कल्याणकारी गोष्टी या फार महत्त्वाच्या आहेत. हे आपल्या दैनिक व्यवहारातही समजून येते. निसर्गातील सुंदर आणि स्वच्छ हवा. शुद्ध पाणी. आणि जमिनीवरील निरोगी माती हे आपणा सह वनस्पतीलाही फार गरजेचे आहे. आपल्याला मिळणाऱ्या अन्नाचा स्रोत हा वातावरणाच्या परिस्थितीवर नेहमी अवलंबून असतो . त्यामुळे जैविक विविधतेने नटलेल्या सृष्टीचा आपणासही संबंध आहेत. याची कल्पना आपल्याला आयुष्यात नेहमी मिळते.
आयुष्यातील निर्माण होणारे आजार . विकार आणि आरोग्य जर निरोगी हवा असेल तर निसर्गाच्या सानिध्यात आपले जीवन व्यतीत करणे फार गरजेचे आहे. संसर्ग जन्य आजार आणि निर्माण होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव त्यातील साथीचे आजार हे वातावरणातील बदलाने निर्माण होतात हे आपणास जाणवते. नैसर्गिक साधने हीच आरोग्याची स्वतः काळजी ठेवण्याची प्रणाली आहे. त्यामुळे मानवाला जन्म जात उपचारात्मक कार्य करून व्यक्तीला सतत निरोगी ठेवण्याचे कार्य हे निसर्ग करत असतो . त्यामुळे व्यक्तीचे मन शरीर आणि भावना यांचे संतुलन आणि सुसंवादितपणा निर्माण होणे. खरी काळाची गरज आहे.
आपल्या शरीरातील पचनशक्तीला सुदृढ ठेवून सतत रक्त शुद्ध होण्याचे कार्य किंवा हृदय विकार कमी करण्याचे कार्य तसेच बाहेरच्या वातावरणामुळे सूर्यप्रकाशात हाडे बळकट करण्याचे काम म्हणजेच विटामिन डी वाढ वण्याचे कार्य हे निसर्ग करीत असतो. आपली प्रतिकारशक्ती त्यामुळे वाढते आपणास कोणताही आजार होऊ नये . यासाठी निसर्गाची आपल्याला देणगी आहे.
आपल्या सभोवतालची जंगले. नदी ,नाले, महासागर ,शेती त्यातील माती त्यामुळे वनस्पती आणि आपले शेतीतील अन्नधान्य हे निसर्गनिर्मित आहे. सुजलाम्! सुफलाम... चांगल्या प्रकारे करते.. आपल्या जीवनातील आनंदासाठी आणि समृद्धीसाठी ज्या असंख्य गोष्टी / वस्तू स्वरूपात मिळतात . हीच खरी नैसर्गिक संपत्ती आहे. हि खरी जगाची मोठी नैसर्गिक राजधानी आहे.
निसर्गाचा मानवी शरीरावर होणारे परिणाम
आपणास नेहमी नैसर्गिक वातावरणातील मनमोहक निर्माण होणारी दृश्य पाहताना मोठा आनंद मिळतो. त्यामुळे मनात राग,भीती, चिंता आणि मनाचा ताण कमी होतो . शरीरात भावनिक सुदृढता मिळते . त्यामुळे शरीरातील वैचारिक ताण कमी होऊन निर्माण होणारा रक्तदाब - ब्लड प्रेशर स्थिर होऊन शरीरातील निर्माण होणारा स्नायू वरील ताण आपोआप कमी होतो .आपल्या मज्जासंस्थेतील अंतस्त्रावी घटक निर्माण होऊन रोग प्रतिकार शक्ती आपोआप उत्साही निर्माण होते. कोणत्याही वयात किंवा संस्कृतीमध्ये मानवी मनाला निसर्ग हा नेहमीच आवडतो . शास्त्रज्ञांच्या एका निष्कर्ष अभ्यासानुसार असे आढळून आले की .-- जगात दोन तृतियांश पेक्षा जास्त व्यक्ती तणावग्रस्त आहेत. ते आराम करण्यासाठी नैसर्गिक वातावरणात आपल्या कार्याच्या काही वेळा - काही दिवस ते पर्यटनाला किंवा धार्मिक स्थळी किंवा समुद्रकिनारी फिरायला भ्रमंती करायला जातात. निसर्गात राहिलात तर मनातील विचार , टेन्शन ,भीती आपोआप कमी होते . त्याला औषधोपचाराची गरज नाही आणि यामुळे मृत्यूचा दरही कमी होतो. निसर्गामुळे आपल्या शारीरिक वेदना कमी होतात . आपण बाहेर निसर्गात फिरल्याने मनातील सकारात्मक मोड आणि मानसिक आरोग्य चैतन्यदायी निर्माण होते . शरीरात एक हार्मोन्स वाढतो . त्यामुळे शरीराची पचनशक्ती सुदृढ होते .आणि आरोग्यातील नवचैतन्य
निर्माण होते.
आपल्या रहिवासी असलेल्या घराच्या अथवा बंगल्यासमोर जर नेहमी जमिनीवर झाडे फुलांच्या कुंड्या, हिरवळ गवत, नारळाची आंब्याची झाडं ,केळीची, चिकूची झाडं, भाजीपाला त्यांची रोप आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलांची बहरणारी रोपे लावली . तर नैसर्गिक वातावरण निर्माण होत मनाच्या हृदयामध्ये स्वतःला प्रसन्न वाटून घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदी हसत खेळत गोड बोलून येणाऱ्या अतिथीचे किंवा शेजारी पाजाऱ्यांचे स्वागत करून संबंध दृढ होतात. मनातील हिंसाचार, क्रोधी, आक्रमकतेची भावना आपोआपच नाहीसे होते. याही निसर्गाचा परिणाम आपल्या मनापासून शरीरावर होत असतो.
नैसर्गिक तेचा जगात - वेळेचा अभाव
आता... निसर्गाचा जगातील व्यक्तींना वेळेचा अभाव निर्माण होताना दिसतो. माणसाचा एक लाजिरवाणा काळ
जवळ येत आहे .असे वाटते... कारण आज प्रत्येकाला वेळ कुठे आहे.. घरात कामावरून आल्यावर TV टीव्ही आणि हातातील मोबाईलच्या स्क्रीनवर तासान तास बसल्यामुळे माणूस निसर्ग विसरत चाललाय असे वाटते. तो स्वतः अबोल, वैचारिक, नैराश्याशी जोडला जात आहे. वाचन संस्कृती आणि श्रवण संस्कृती कमी होऊन लिखाण करण्यास त्याला वेळ नाही तर सर्वसाधारण ज्ञान कमी झाले आहे .जगाशी व्यवहाराला एक तो शिल्लक राहिला नाही. शिकण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. फक्त तो त्याचे ऑफिस अथवा दुकानदारी अथवा शेतातील कामे करून मोबाईल हातात घेऊन बघणे. त्याला फार आवडते. यामुळे परोपकाराच्या त्यातील सहकार्याचा भावना कमी झाल्यामुळे माणूस एक अपराधी झाल्यासारखा वाटतो .शारिरीक हालचाली कमी होऊन मानसिक आजार निर्माण झाले. तो अबोल होत वकृत्व करत नाही. राग, संताप ,संशय, वाढलेले मनात सतत दुसऱ्याविषयी नैराश्य निर्माण झाले आहे आणि माणूस एकटा पळत जाऊन स्वतःची प्रगती करीत विलासी चैनी आणि लाजाळू झाला आहे त्यामुळे त्याचे आजारपण वाढत आहे.
निसर्ग आणि आरोग्य नेहमी जीवनात हातात हात घालून चालतात .आपल्या शरीराचे फिटनेस वाढवतात.
निसर्गाचा शरीरावर होणारे बदल
१) आपण रोज सकाळी सूर्योदय अगोदर एक तास फिरायला गेल्यास किंवा योगा व्यायाम मैदानी खेळ खेळल्यास आपल्या फुफ्फुसातिल कफ, एलर्जी, खोकला, दमा,आपोआप कमी होऊन हृदयाची गती वाढून शहराचा रक्तदाब स्थिर राहतो. फिरल्याने मानसिक प्रेरणा वाढते. शारीरिक हालचालीने सांध्यांच्या वेदाना कमी होतात. संधिवात होत नाही. सकाळची शुद्ध हवा आपल्या शरीरात निरोगीपणा निर्माण करते.
२) निसर्गामुळे आणि पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासाप्रमाणे आपले शरीरातील नैराश्य, चिंता,ताण, मानसिक आजार हे कमी होतात.
३) वर्तमानामध्ये निसर्गाशी जोडल्यामुळे शरीर स्थिर राहण्यास मदत होऊन भविष्याबद्दलची चिंता आपोआप कमी होते. त्यामुळे आपण जागृत राहावे.
४) आपण घराच्या बाहेर पडल्यावर मंद गार हवा आपल्या अंगाला सहारा आणते, म्हणजेच मनाचा दृष्टिकोन बदलतो काय विश्व आहे ? काय रचना आहे काही आजार सुगंधित गार हवेने आणि निसर्गाच्या सानिध्यात गेल्याने आपोआप बरे होतात.
५) आपण सकाळी फिरायला जाताना निसर्गाशी संवाद साधा. पक्षांचा आवाज, सकाळचे किलबिल,फुलांचा बगीचातील झाडांचं हवेमुळे वाकणं, आकाशातील निळसर ढग ,त्यात पांढरी आकाशगंगा बघितल्या वरती मनाला विपरीत आनंद वाटते.
६) शरीराला निसर्गाची खरच गरज आहे.
निसर्गामुळे शारीरिक . मानसिक आजार सहज बरे होतात. यावरून आपल्याला आता समजले की खरोखर हरियाली और रास्ता या सिनेमांमध्ये निसर्ग आणि माणूस कसा संबंध असतो हे दाखवण्यात आले आहे.
Tags:
आरोग्य