राज्यात आज पासून वरिष्ठ आणि निवड श्रेणी चे ट्रेनिंग राज्यभर सुरू झालेले असुन.
आज पहिल्याच दिवशी अनेक सेंटरवर शिक्षक उशिरा गेल्याने त्यांना ट्रेनिंगला बसू दिले नाही, त्या व अनेकांचे फोन आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना आले, त्यानुसार आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी, शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांची मंत्रालयात भेट घेऊन , सदरची गंभीर बाब त्यांच्या लक्षात आणून दिली, त्यानुसार माननीय मंत्री महोदय यांचे ओएसडी श्री महेंद्र पवार साहेब यांनी संचालक श्री राहुल रेखावर साहेब यांना फोन करून मंत्री महोदयांचा निरोप दिला. त्यानुसार आज जे शिक्षक वरिष्ठ निवड श्रेणीसाठी उशिरा गेले होते.
त्या सर्वांना उद्यापासून ट्रेनिंगला हजर करून घेता येईल, व आपले ट्रेनिंग पूर्ण करता येईल, आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी घेतलेल्या तात्काळ दखलीमुळे ट्रेनिंग पासून वंचित राहणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे अशी माहिती श्री प्रशांत भामरे कोकण अध्यक्ष शिवछत्रपती शिक्षक संघटना यांनी दिली आहे
Tags:
शैक्षणिक