राज्यात बारा वर्षांनंतर येणारा गोदावरीच्या काठावर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या बहुचर्चित सिंहस्थ कुंभमेळ्यातील मुख्य तीन पर्वण्यांच्या तारखा जाहीर झाल्या असून दोन्ही ठिकाणी प्रथम आणि द्वितीय पर्वणी एकाच दिवशी अनुक्रमे २ ऑगस्ट २०२७ आणि ३१ ऑगस्ट २०२७ रोजी आहे. नाशिकमध्ये तृतीय पर्वणी ११ सप्टेंबर २०२७ रोजी तर, त्र्यंबकेश्वर येथे १२ सप्टेंबर रोजी राहणार आहे. मात्र, या कुंभमेळ्याचा सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६ होणार आहे.
कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळयासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकायनि जग स्तिमित होईल असे भव्य-दिव्य आणि स्मरणीय आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांनी दिली. नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्पातील अमृत स्नानाचे दिवसही मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
साधू-महंतांच्या उपस्थितीत कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा होणे ही खऱ्या अर्थाने कुंभपर्वाची सुरुवात आहे, असे नमूद करू मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुंभमेळ्याचे संचलन आखाडे, साधू महंत करतात, राज्य शासन सेवक म्हणून अधिकाधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करते. यावेळी देखील शासनातर्फे उत्तम सुविधा उभारण्यात येतील. कुंभमेळ्याबाबत साधू-महंतांचा अनुभव मोठा आहे, त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. २०१५ मध्ये तयारीसाठी कालावधी कमी होता. यावेळी पूर्व तयारीसाठी अधिक कालावधी असल्याने शासन चांगली तयारी करीत आहे.
साधू-महंतांच्या सूचना लक्षात घेऊन शासन आवश्यक नियोजन करेल. आखाड्यासाठी आवश्यक सुविधा उपालब्ध करून देण्यात येतील. साधुग्रामची जागा कायमस्वरूपी उपयोगात मावी यासाठी जमिन अधिग्रहित करण्यात येईल,
त्र्यंबकेश्वर कुंभमेळा
सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ - शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६.
१) प्रथम अमृतस्नान-सोमवार २ ऑगस्ट २०२७, आषाढ सोमवती अमावस्या.
२) महाकुंभस्नान/द्वितीय अमृतस्नान-मंगळवार ३१ ऑगस्ट २०२७, श्रवण अमावस्या,
३)तृतीय अमृतस्नान-शनिवार १२ सप्टेंबर २०२७, भाद्रपद शुद्ध द्वादशी (वामन द्वादशी).
याशिवाय नाशिक येथे सिंहस्थ पर्व पर्वकालातील सर्व एकादशी, पौर्णिमा, अमावस्या वैधूती व्यतिपात योग हे दिक्स भाविकांसाठी तीर्थस्थान, दर्शन पर्व असतील. नाशिक येथे कुंभमेळा २०२७ मध्ये मुख्य तीन पर्वण्याव्यतिरिक्त पर्वस्नानाचे एकूण ४४ मुहूर्त असून त्र्यंबकेश्वर येथे पर्वस्नानाचे एकूण ५३ मुहूर्त आहेत, भाविकांनी अमृत स्नानाशिवाय पर्वस्नानाचा दिवसी देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
Tags:
धार्मिक