जिल्हयातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दल व प्रथम' या संस्थेच्या संयुक्त विदयमाने "मिशन सक्षम" या उपक्रमाची जानेवारी महिन्यात सुरूवात करण्यात आली असुन त्यावेळी 200 तरुणांनी सदर प्रशिक्षणासाठी आपले नाव नोंदवून प्रथम या संस्थेमार्फत 14 विविध प्रकारचे रोजगारासंदर्भात 45 दिवसाचे प्रशिक्षण घेतले असुन प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर उमेदवारांना NSDC आणि शासकिय (Third Party Assesment) असे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले होते तसेच प्रशिक्षणार्थी यांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सदर संकल्पनेला नंदुरबारच्या तरुणांनी पसंती दर्शविल्याने पुन्हा एकदा जिल्हयातील तरुणांना "मिशन सक्षम 2.0" मध्ये सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांनी आवाहन केले असून आतापावेतो 750 विदयार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाद्वारे आपले नाव नोंदणी केली आहे. तरी जिल्हयातील तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त तरुणांनी दि. 25/06/2025 रोजी 11.00 वाजता पोलीस मुख्यालय येथे हजर रहावे.
Tags:
शासकीय