येथील श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए.एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर मधील इ.10 व 12 वीत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय परिवाराकडून सत्कार समारंभ करण्यात आला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष नवापूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शिरीषभाई शहा, प्रमुख अतिथी श्री रतिलाल भाई जयस्वाल व सौ रजनीताई जयस्वाल, नवापूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री रजनीकांत मिस्त्री, श्री परागभाई ठक्कर, श्रीमती अर्चनाबेन शाह, एन डी अँड एम वाय सार्वजनिक गुजराती हायस्कूलचे प्राचार्य संजय कुमार जाधव, सार्वजनिक प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक महेश पाटील,प्राचार्य मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक नारायण मराठे, पर्यवेक्षक दीपक मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख मेघा पाटील, उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
प्राचार्य मिलिंद वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सध्याच्या मेरिटची कल्पना देत अधिक जागृत राहून विद्यार्थ्यांनी मेहनत करा व यशस्वी व्हा असा संदेश दिला.
इ.12 वी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक तनया प्रवीण साळुंखे , द्वितीय क्रमांक मोहित प्रवीण ब्रम्हे , तृतीय क्रमांक जान्हवी पराग पुराणिक, आदिवासी गटातून प्रथम तेजस्वी दिलीप गावित कला शाखेत प्रथम क्रमांक नर्गिस फियाजोदीन मकरानी, द्वितीय क्रमांक व आदिवासी गटातून प्रथम अस्मिता विनोद गावित , तृतीय क्रमांक व अजय मांज्या गावित इ 10 वीत प्रथम क्रमांक जयकुमार संजय कुमार जाधव, द्वितीय क्रमांक प्रेरणा महेंद्र दुसाने, मनियार अमान गुफरान व लोकेश महेश पाटील तृतीय क्रमांक व आदिवासी गटातून प्रथम हर्षद बापू गवळी या विद्यार्थ्यांला लक्ष्मण वळवी यांच्या वतीने आदिवासी विध्यार्थ्यांमधील प्रथम येणाऱ्या विध्यार्थ्याला पालकांसह सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय परिवार व शिक्षकाचे आभार मानले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक यांनी सुद्धा शालेय परीवार व शिक्षकांचे आभार मानले व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगीतले की इ 1 ते 12 वीत प्रवेश घ्यायचा असेल तर सार्वजनिक हायस्कूल हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
अध्यक्षीय भाषणात शिरीषभाई शहा यांनी आपल्या मनोगतातून संदेश दिला की केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे . विद्यार्थी जीवनात जर ध्येय गाठायचे असेल त्यासाठी हार्डवर्क करून समाज, राष्ट्र हिताचे कार्य जिद्द ठेवून करा व यशवंत होऊन आपले भविष्य उज्ज्वल करण्याचा संदेश दिला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठीचे सन्मानचिन्ह श्रीमती मेघा पाटील यांच्या सौजन्याने मातोश्री कै. वंदना बंन्सीधर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह भेट देण्यात आले. डॉ योगिता पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ भेटवस्तू ,हिंदी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमोल दिवटे सरांकडून रोख रक्कम,विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी डॉ गणेश महाजन यांच्याकडून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तक भेट स्वरूपात देण्यात आले. जयश्री चव्हाण यांच्याकडून भौतिकशास्र विषयात प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्याला रोख रक्कम भेट देण्यात आले. कविता खैरनार यांच्याकडून इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आले.
तसेच श्री नंदकुमार कलवार व सौ रजनीताई जयस्वाल यांच्याकडून इयत्ता पाचवी प्रवेश घेतलेल्या 75 गरजू विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता खैरनार यांनी तर आभार प्रदर्शन दर्शन अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
Tags:
शैक्षणिक