पुनर्जन्म आणि आयुष्याचा अर्थ :जीवनाच्या "अनादि-अनंत" प्रवासावर एक चिंतन - करसल्लागार नितीन डोंगरे, कोपरगांव

कोपरगांव सत्यप्रकाश न्युज 
आपलं कर्म, 
पुनर्जन्म आणि आयुष्याचा अर्थ :
जीवनाच्या "अनादि-अनंत" प्रवासावर एक चिंतन
आपण माणूस म्हणून या पृथ्वीवर जन्म घेतो, ही एक साधी वाटणारी पण अत्यंत गूढ प्रक्रिया आहे. प्रत्येकजण कोणत्या तरी पोटातून जन्मतो, कोणत्यातरी कुटुंबात वाढतो, आणि मग हळूहळू स्वतःचं अस्तित्व, स्वताची खास ओळख निर्माण करतो. 
पण हे सगळं घडतं ते कशावरून?
तर याच एकच उत्तर आहे 
की, "कर्मावरून "!
पूर्वजन्म आणि पुनर्जन्म आपल्या  आत्म्याचा अविरत प्रवास असतो हे सत्य आहे.
भारतीय तत्वज्ञानामध्ये आत्मा हा, अमर आणि अविनाशी मानला गेलेला आहे. शरीर नश्वर आहे, 
पण आत्मा अनेक जन्म घेत असतो.
पूर्वजन्मात केलेल्या कर्मांचे फल हेच पुढच्या जन्मात आपल्याला कोणत्या घरात जन्म मिळेल, 
कोणत्या परिस्थितीत वाढ होईल, हे ठरवत असतं.
कोणी श्रीमंत घरात जन्म घेतो, 
कोणी गरिबीचा सामना करत मोठं होतं, या साऱ्यामागे केवळ सध्या दिसणारी समाजव्यवस्था नाही, तर एक विशिष्ट अदृश्य कर्मबंधन असतं.
 कर्माचा न्याय अत्यंत कठोर पण नीतिमूल्यांनी युक्त असतो.
आपल्या कर्माला आपल्याला फसवता येत नाही. ते नेहमी प्रत्येक घटनेची अचूक नोंद घेतं, शांतपणे, काटेकोरपणे.
म्हणूनच "जे पेराल, तेच उगवेल" हे तत्त्व इतकं कालातीत आणि सत्य ठरतं.
जर आपण पूर्वी कोणावर अन्याय केला असेल, तर आज आपणही एखाद्या वेदनेतून जातो.
जर आपण प्रेम, मदत, सेवा केली असेल, तर आयुष्य कोणत्या ना कोणत्या रूपात त्याचे फळ आपल्याला परत करतं.
 "मी कोण?" 
असा किंवा  हा प्रश्नच आपल्याला आत्मशोधाची सुरूवात करायला भाग पाडतो.
आपण आपल्याच आयुष्याकडे जर खोलवर पाहिलं, तर एक क्षण येतो, जिथे वाटतं की, मी नुसतंच शरीर नाही, 
तर एक हेतू आहे, एक कार्य आहे!
त्याच वेळी मनात अनेक प्रश्न डोकावतात
की मग, 
माझे पूर्वज कोण होते?
माझा आत्मा काय शोधतोय?
मी जन्माला का आलोय?
माझं या जगातलं स्थान काय?
हे प्रश्न म्हणजे माणसाच्या,आयुष्याच्या परीक्षेचे प्रश्नपत्र! 
आणि त्याची उत्तरे आपल्याला आपल्या कृतीतून शोधावी लागतात.
चांगलं कर्म ही चांगल्या जीवनाची बीजं ठरतात.
जगण्याच्या गडबडीत आपण अनेकदा विसरतो की, आपल्यामुळे इतरांना किती सुख मिळतं, हेही आपलं एक महत्त्वाचं कर्म आहे.
यासाठीच,
🔸 आपल्या बोलण्यात नम्रता असावी,
🔸 आपल्या कृतीत सज्जनता असावी,
🔸 आपल्या उपस्थितीत इतरांना समाधान मिळावं..
हीच माणसाची खरी सर्वोत्तम सेवा आहे.

जीवन म्हणजे पूर्वगामी कर्माची फळं आणि नव्या कर्माची तयारी असते हे निश्चित.
आज आपण ज्या रूपात आहोत, जिथे आहोत, हे सगळं पूर्वगामी हिशेबाचं उत्तर आहे.
पण उद्याचं आयुष्य काय असेल, हे आपण आज काय कर्म करतो त्यावर अवलंबून आहे.
म्हणूनच –
"चांगलं विचारायचं, चांगलं वागायचं, आणि चांगलं जगायचं!"
हेच खरं धर्म आणि हेच खरं मुक्तीचं साधन.
    शब्दांकन -  नितीन दत्तात्रय डोंगरे
                    करसल्लागार, कोपरगांव 

Post a Comment

Previous Post Next Post