महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत जून-जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (३.१० वी) पुरवणी परीक्षा मंगळवार, दिनांक २४ जून २०२५ ते मंगळवार, दिनांक ०८ जुलै २०२५ या कालावधीत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (३.१२ वी) पुरवणी परीक्षा मंगळवार, दिनांक २४ जून २०२५ ते बुधवार, दिनांक १६ जुलै २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
सदर परिक्षेस खालील प्रकारे विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे
१) मंडळामार्फत प्रसिध्द व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.
२) सकाळ सत्रात स. १०.३० वाजता व दुपार सत्रात दु. २.३० वाजता परीक्षाथ्याँनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळ सत्रात स.११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु.३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.
३) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेप्रमाणेच जून-जुलै २०२५ परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे.
४) फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेप्रमाणे जून-जुलै २०२५ च्या पुरवणी परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन व श्रेणी इ. परीक्षांचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरून घेण्यात येणार आहेत. याबाबतची लिंक व सविस्तर सूचना विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.
अशी माहिती राज्य सचिव शिक्षण देविदास कुल्लाळ पुणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
Tags:
शैक्षणिक