येथील पोलीस ठाणे गु.र.नं. 386 / 2025 भा.न्या.सं. कलम 331 (1), 305 अन्वये दिनांक 22/6/2025 रोजी 18:53 वाजता गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी जयेश शंकर बसावे वय 32 वर्षे, धंदा नोकरी, राहणार शास्त्री नगर, नवापुर, ता. नवापुर, जि. नंदुरबार हे त्यांचे परिवारासह शास्रो नगर येथील राहते घरात पुढचे खोलीत झोपले असतांना दिनांक 21/6/2025 रोजी रात्री 22:00 ते दिनांक 22/6/2025 रोजी सकाळी 06:00 वाजेचे दरम्यान एका अज्ञात आरोपी याने त्यांचे राहते घराच्या मागच्या दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश करुन घरातील लाकडी टेबलवर ठेवलेले फिर्यादी यांचे दोन अंनरॉईड मोबाईल फोन तसेच लाकडी कपाटत ठेवलेले पर्स मधील गळ्यातील सोन्याची पोत, कानातील लहान झुंबर, हातातील मनूगटी घड्याळ असा एकुण 1,52,650/- रुपये किमतीचा मुद्देमाल हा चोरी झाला असल्याचे जयेश शंकर वसावे यांनी दिलेल्या प्रथम खबर वरुन वर प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचे त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक अभिषेक दिलीप पाटील यांनी सदर गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना कळविली. त्यानंतर त्यांनी गुन्ह्याचा सखोल तपास व आरोपी शोधकामी विशेष पोलीस पथक तयार करुन सदर घटनास्थळाचे पासुन आरोपी यांस येण्याचा व जाण्याचा मार्गावरील सर्व रस्त्यावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेरांची पाहणी करुन सदर जाण्याचा मार्ग निश्चित करुन त्या दिशेने तपासाची सुत्रे वळविली. सदरचा तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गुप्त बातमीदार यांचेमार्फत काही संशयीत व्यक्तीचे घटनेचे वेळी झालेल्या हालचाली बाबत माहिती मिळाली. एकंदरीत प्राप्त गोपनिय माहिती व तांत्रिक विष्लेषनाअंती सदरचा गुन्हा हा नवापूर शहरातील शास्री नगर मधील राहणार एक विधीसंघर्षग्रस्त बालक (नाव अ.ब.क. - विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याने नमुद नाही.) याने सदरचा घरफोडी चोरीचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले.
त्या अनुषंगाने पोलीस पथकाने नवापुर शहरातील शास्त्री नगर येथील विधीसंघर्षग्रस्त बालक याचे राहते घरी जावुन शोध घेतला असता तो घरी हजर मिळून आला. त्याचे आईचे उपस्थितीत त्यांस सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने दोन पंचाचे समक्ष त्याचे राहते घराची घडझडती दरम्यान त्याने सदर घरफोडी चोरी केलेले दोन अॅनरॉईड मोबाईल फोन, गळ्यातील सोन्याची पोत, कानातील लहान झुंबर, हातातील मनगटी घड्याळ असा एकुण 1,52,650/-रुपये किमतीचा मुद्देमाल हा काढून दिल्याने दोन पंचाचे समक्ष सविस्तर पंचनामा करुन जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्यानील घटनास्थळावरुन चोरीस गेलेला मुद्देमाल हा पोलीसांनी शोध घेवुन त्यातील एका विधीसंघर्षग्रस्त बालक (नांव अ.ब.क.) यांस ताब्यात घेवुन सखोल विचारपुस करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे, पोलीस हवालदार अमोल जाधव, दिनेशकुमार वसुले, पोलीस शिपाई दिनकर चव्हाण, दिनेश बाविस्कर, संजय गावीत, महिला पोलीस नाईक भारती आगळे यांच्या पथकाने केली असुन वरिष्ठांचे मार्गदर्शना नुसार सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे हे करीत आहेत.
तरी नवापुर शहरातील सर्व नागरीक यांना कळविण्यात येते की, त्यांचे स्वतःचे राहते घरातील किमती वस्तु व बाहेर उभे केलेल मोटार सायकलचे सुरक्षिततेचे दृष्ट्रीने रस्त्याने येणारे जाणारे इसम दिसतील अशा दिशेने सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसवुन घ्यावे करीता जाहिर आवाहन करण्यात येत आहे.
Tags:
गुन्हे/अपराध