सार्वजनिक गुजराती हायस्कूल मध्ये योग दिवस साजरा

नवापूर सत्यप्रकाश न्युज 
    येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात *दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित, दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे संपन्न झाला. या विशेष प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी व योगगुरु श्री अमर वंड्रा  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या सूचनेनुसार करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवातीला योगगुरु  अमर वंड्रा  यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना योगाचे शास्त्रीय महत्त्व, मानसिक आरोग्यासाठी योगाची भूमिका, तणावमुक्त जीवनासाठी योगाची गरज यावर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी शैलीने सर्व उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला.
यानंतर त्यांनी आयुष मंत्रालयाने निर्देशित केलेल्या योगसत्राचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यात प्राथमिक शारीरिक हालचालींचा सराव, नंतर बैठी, उभी, पाठीवर व पोटावर झोपून करण्यात येणारी योगासने, तसेच प्राणायामाचे विविध प्रकार शिकवले गेले. विद्यार्थ्यांनी पूर्ण उत्साहाने त्यात सहभाग घेतला. योगगुरुंनी प्रत्येक आसनाचे शारीरिक, मानसिक व भावनिक फायदे* सोप्या शब्दात समजावून सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी शितलीकरणाच्या हालचाली आणि मनोरंजनात्मक क्रियाकलाप विद्यार्थ्यांना करून घेतले गेले, ज्यामुळे वातावरण प्रसन्न आणि हलकंफुलकं झालं.
  कार्यक्रमानंतर शाळेचे मुख्याध्यापक  संजय कुमार जाधव  यांच्या हस्ते योगगुरु अमर वंड्रा  यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. तत्पश्चात अमर सर यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी आपल्या मोठ्या बंधूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेला एक विशेष भेट वस्तू देखील सप्रेम दिली.
संपूर्ण कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना शीतपेयाचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण दिसून आले.
  सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक  संजयकुमार जाधव , उपमुख्याध्यापिका श्रीमती. कमलबेन परिख, उपप्राचार्य  नरेंद्र पाटील , पर्यवेक्षक  जाहिद पठाण, पर्यवेक्षिका श्रीमती. निर्जलाबेन सोनवणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
   योग दिनाचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता वाढली असून, त्यांनी नियमित योगसाधना करण्याचा संकल्प केला.शाळेचे मुख्याध्यापक  संजय कुमार जाधव  यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पडला.
   कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे क्रीडाशिक्षक  श्रीकांत पाटील निलेश गावंडे गुफरान मणियार दर्शन सोनवणे कुणाल पंचाल  आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे विशेष योगदान लाभले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  निलेश गावंडे  व श्रीकांत पाटील यांनी तर आभार प्रदर्शन.गुफरान मनियार यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post