कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी उपसंचालक श्री महेश चोथे साहेब , शिक्षणाधिकारी माध्यमिक/ प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कविता शिंपी मॅडम लेखाधिकारी साळवी मॅडम यांच्या उपस्थितीत माध्यमिक पतपेढी ओरस येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर बांधवांच्या प्रलंबित समस्याबाबत आढावा बैठक घेतली. शिक्षक , शिक्षकेत्तर, संस्था तसेच विद्यार्थी इत्यादीच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात आले.*
*या सभेमध्ये मुख्याध्यापक मान्यता, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी, पीएफ, पीएफ स्लिपा, थकित बिले, सीएच बिल, रजा कालावधी बिले, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी मान्यता इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली व प्रलंबित प्रश्न पंधरा दिवसाच्या आत सोडवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच वादग्रस्त प्रकरण मध्ये संघटनेच्या सर्व प्रतिनिधींनी संस्था मुख्याध्यापक यांच्याशी सामंजस्याने चर्चा करून न्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या , गरज लागल्यास मी सुद्धा त्यांच्याशी बोलतो असे आव्हान केले, सर्व संघटनेच्या प्रतिनिधींनी आणि उपस्थित शिक्षक शिक्षकेतरने आपापल्या समस्या मांडल्या, त्यावर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, उपसंचालक महेश चोथे साहेब आणि कविता शिंपी मॅडम त्यांनी समस्या ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, उपस्थित आणि छान प्रकारचे सभा झाली म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे आभार मानले*
*यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फेसर , शिक्षक परिषदेचे श्री.भरत केसरकर, शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री.आडेलकर, कार्याध्यक्ष श्री वेतुरेकर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप कदम, अंशतः अनुदानित संघटनेचे अध्यक्ष/ जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष श्री चोडणकर सर, घावरे सर, सावंत सर, कुसगावकर सर ,दहिबावकर सर, जिल्हा शिक्षक पतपेढी अध्यक्ष लांबोरे सर, शिक्षकेतर संघटनेचे नानचे, प्रयोगशाळा संघटनेचे काळे सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Tags:
शैक्षणिक