राज्यातील 63 हजार शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना टप्पा अनुदान मिळावे म्हणून आ. ज्ञानेश्वर म्हात्रे एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट ..

.  मुंबई सत्यप्रकाश न्युज 
  राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना 14 ऑक्टोबर 2024 च्या जीआर नुसार टप्पा अनुदान मिळावे म्हणून आणि येणाऱ्या पावसाची अधिवेशनामध्ये त्या टप्पा वाढ अनुदानाची तरतूद करावी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व. शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांची भेट घेऊन 14 ऑक्टोबर 2024 रोजीच्या जीआर नुसार राज्यातील सर्व शिक्षकांना टप्पावाढ देऊन राज्यातील शिक्षकांना न्याय द्यावा अशी विनंती केली. 
    यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले की सरकार यावर कामकाज करत असून त्यावर लवकरच तरतूद केली जाईल व राज्यातील शिक्षकांना अनुदान मिळेल असे आश्वासित केले.
   त्यानंतर आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 05.06.2025 पासून टप्पावाढ अनुदान मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्यातील अनेक शिक्षक बांधव उपोषणाला बसले आहेत त्या शिक्षक बांधवांची भेट घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या सोबत केलेल्या चर्चेचा निरोप पोहोचवला व त्यांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post