महाराष्ट्र राज्यातील समग्र शिक्षा अभियानातील जवळपास 3000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गेली अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत, आशा सर्व व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना राज्य शासनाच्या सेवेमध्ये सामावून घेण्याकरिता आ.ज्ञानेश्वर म्हात्रे , आ. ज मा अभ्यंकर , आमदार मनीषा कायंदे , आ. किशोर दराडे आग्रही आहेत, सदर शिक्षकांना न्याय मिळावा म्हणून वारंवार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्यासोबत पाठपुरावा करत आहेत, त्यांच्याकरिता विधिमंडळामध्ये लक्षवेधी लावून, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये औचित्याचा मुद्दा मांडून विविध मार्गाने या प्रश्नाला आ. ज्ञानेश्वर म्हात्रे हात घातला होता.
त्यानुसार आज समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल समिती गठीत करण्यात आली होती, या समितीमध्ये आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना देखील सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
त्या समितीची आज दिनांक 25.06.2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. ज मो अभ्यंकर, यांनी बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाजूने बाजू मांडून सखोल आणि सकारात्मक विषय चर्चेले गेले, पंधरा दिवसाच्या आत अन्य राज्यामध्ये अभ्यास करून अहवाल द्यावा, एक महिन्यानंतर पुन्हा ही बैठक आयोजित करावी व त्यातून कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल आणि राज्य शासनामध्ये सामावून घेण्याबाबत आशेची किरण दिसत आहे. समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झालेले असून त्याकरिता अजून एक बैठक बोलावली जाणार आहे, या सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना न्याय देईपर्यंत मी प्रयत्नशील राहणार असून सर्वांना न्याय देईल असे आश्वासित आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. ज मो. अभ्यंकर, यांनी सांगितले या बैठकीसाठी अप्पर मुख्य सचिव संतोष कुमार , शिक्षण सचिव रणजितसिंह देओल , राज्य प्रकल्प संचालक यादव साहेब, उपसंचालक उत्तम कांबळे , शिक्षण उपसचिव तुषार महाजन , वित्त विभागाचे उपसचिव तसेच प्राध्यापक धोंडे, संघटनेचे पदाधिकारी प्रकाश आंबेकर, योगिता बलाक्षे उपस्थित होते.
Tags:
शैक्षणिक