विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे आपले प्राथमिक कर्त्तव्य -नुतन उपसंचालक संजीवकुमार राठोड .

      नाशिक सत्यप्रकाश न्युज 
    विद्यार्थ्यांचे  प्रश्न  सोडवणे  आपले  प्राथमिक  कर्त्तव्य  आहे, विभागातील  सर्व  शाळात  विद्यार्थी  लाभाच्या  योजना  राबविणे,  गुणवत्ता पूर्ण  शिक्षण  देणे, आलेल्या  तक्रारींचे  नियमानुसार निरसन  करणे,सेवा हमीं कायद्याचे  पालन  करने  हे आपल्या प्रत्येकाचे  कर्त्तव्य  आहे, असे श्री संजयकुमार राठोड  यांनी शिक्षण उपसंचालक  कार्यालयातील  अधिकारी कर्मचाऱ्यांशी  रुजू झाल्यानंतर बदलून गेलेले  शिक्षण उपसंचालक  डॉ  बी बी  चव्हाण  यांचे कार्यमुक्त व शुभेच्छा  देण्यासाठी झालेल्या  छोटेखानी  बैठकीत मत व्यक्त केले, 
      यावेळी सहायक  शिक्षण  संचालक डॉ. मच्छिंद्र कदम, मंडळाचे  सचिव  मोहन  देसले प्रशासन अधिकारी जितेंद्र गाढे, दिपाली पाटील, दिनेश देवरे, एल डी  सोनवणे, सर्व  कर्मचारी उपस्थित  होते,  डॉ. मच्छिंद्र कदम यांनी  प्रास्ताविक करून  डॉ  बी बी  चव्हाण  यांनी  गेल्या  साडे तीन  वर्षात केलेल्या  उत्कृष्ट  कामाचे कौतुक केले, दिनेश  देवरे  दिपाली पाटील, गणेश पवार जितेंद्र गाडे यांनी मनोगत व्यक्त केले, सत्काराला  उत्तर  देतांना सकारत्मक  विचाराने मी नाशिक  विभागात विद्यार्थ्यांचे हितासाठी, शिक्षकांचे व  संघटनांचे  प्रश्न सोडविण्यासाठी  काम केले, मुंबई  च्या  शिक्षण उपसंचालक  पदाचा अनुभव  कामात आला, विभागातील  अधिकारी कर्मचारी  यांचे  जबाबदारी ने  काम करण्यासाठी  स्वतः  देखील  जादा वेळ देऊन  काम केले,  सुनावण्या लावून  प्रश्न निकाली  काढले.
    

Post a Comment

Previous Post Next Post