श्रीमती पी ए सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस विभागाकडून अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब लांडगे, पोलीस उपनिरीक्षक, नवापूर, प्रमुख पाहुणे डॉ. युवराज पराडके, विनोद पराडके - गोपनीय अंमलदार , प्राचार्य एम एस वाघ उपमुख्याध्यापक एन एम मराठे, पर्यवेक्षक डी एम मंडलिक , पर्यवेक्षिका एम ए पाटील, ज्येष्ठ शिक्षक बी एम सैंदाणे, टी आर जाधव , सी एस पाटील, योगिता पाटील, दर्शन अग्रवाल , एस एस खैरनार आदी उपस्थित होते.
प्राचार्य श्री एम एस वाघ यांनी विद्यार्थ्यांना नशा मुक्त राहुन आपले जीवन चांगल्या सवयीयुक्त बनवावे व विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचा नशा न करता अभ्यासाचा नशा करावा असे आपल्या प्रास्ताविकेतून मार्गदर्शन केले.
अध्यक्ष मनोगतातून भाऊसाहेब लांडगे, पोलीस उपनिरीक्षक, नवापूर यांनी विद्यार्थ्यांना मनोगतातून सांगितले की, विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या आहारी न जाता चांगल्या सवयी लावाव्यात. तंबाखू, गुटखा, सिगरेट हे देखील अंमली पदार्थ असून चरस,गांजा यासारखेच वाईट व्यसन आहे व त्याचे विद्यार्थ्यांवर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होत असतात.
डॉ. युवराज पराडके यांनी
नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींची कार्यक्षमता व रोगप्रतिकारशक्ती ही इतरांपेक्षा कमी असते व यावर उपाय म्हणून नशायुक्त व्यक्तींशी आपलेपणाने वागून त्यांचे नशाबंदी केंद्रात उपचार सुरू करावे व त्यांना चांगल्या सवयी लावाव्यात असे सांगितले.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस विभागाकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले. निबंध स्पर्धेचे परीक्षण जी आर लोहार व के आर पाटील यांनी केले तर चित्रकला स्पर्धेचे परीक्षण सी एस पाटील व के डी वसावे यांनी केले. दक्ष विजयकुमार कदम, प्रथम, जागृती मुकेश महाले, द्वितीय, कनिष्का राजेश परदेशी, तृतीय, राज जगदीश पाटील, उत्तेजनार्थ या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत यश प्राप्त केले तर राजवीर हरेश वळवी, प्रथम, सोनम गुलाबसिंग कोकणी द्वितीय, अक्षय इत्या कोकणी, तृतीय, या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेमध्ये आपले यश प्राप्त केले
तसेच या कार्यक्रमानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन यांच्यातर्फे या रॅलीला मार्गदर्शन करण्यात आले. रॅलीचे आयोजन सी एस पाटील, कविता खैरनार, एम एस सोनवणे, डी एम खैरनार, मिनल पाटील यांनी केले.
तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन करून त्यांच्या कार्याचे महत्त्व सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी आर लोहार व आभार प्रदर्शन एस एस खैरनार यांनी केले.
Tags:
शैक्षणिक