आरोग्य धनसंपदा सदरातील आजीबाईचा बटवा
आपणास एखाद्या वेळी कमी ऐकू येते किंवा घशातून बोलता येत नाही अथवा आपणाला सर्दीमुळे श्वास घेता येत नाही. या प्रकारचे इतरही लक्षणे माणसाला त्रासदायक ठरतात अशावेळी आपणास कान. नाक. घसा या स्पेशलिस्ट डॉक्टरांना तब्येत दाखवावी लागते प्रथमता आपण आपल्या फॅमिली फिजिशियन डॉक्टर कडे जाऊन बऱ्याच वेळा ट्रीटमेंट घेतो पण नाईलाजाने आपले निदाना नुसार एखाद्या तज्ञ डॉक्टर कडे पुढील तपासणी करावी लागते.
आपल्या पाच ज्ञानेन्द्रयापैकी कान आणि नाग या अतिशय महत्त्वाच्या व नाजूक इंद्रायणी काळजी आपण घेतो.
कानाचे आजार
पावसाळ्याच्या दिवसात किंवा गार हवेत अथवा एसी खाली झोपल्याने किंवा फॅन खाली झोपल्याने कानामध्ये जंतुसंसर्ग म्हणजे बुरशीजन्य (फंगस )आजार होत असतात. कानाला छिद्र पडणे (परफॉर्मशन.) हाडाला कीड लागणे ( कॉलेस्टोमा ) अथवा कानाच्या पडद्यामागे पाणी साचणे कानात शिट्टी वाजणे ( टिन्निटस ) .. कानाच्या आजारामुळे चक्कर येणे (व्हर्टिगो ) त्याचप्रमाणे जबड्याच्या साध्या वर सूज येऊन कान दुखणे. कधी कधी अशा आजारामुळे आपणास बहिरेपणा येतो. कराच्या हाडांमध्ये मळ साचला तर
हाडाची साखळीत तुटते. कधी ठराविक वयोमानाप्रमाणे कानापासून मेदुला जाणारी भ्रमणीने कमजोर होणे म्हणजेच कमी ऐकू येणे. बराच वेळा आपण सकाळी रोज अंघोळ करताना डोक्यावरील केसांना पाण्याने साबण लावून स्वच्छ करतो . पण अंघोळीनंतर टॉवेलने डोकं साफ करत नाही. डोक्यावरील पाणी नेहमी कळत नकळत कानात जाते त्यामुळे मळ ओला होतो आणि आपणास संसर्गजन्य आजार होऊन कानात सेप्टिक म्हणजे दुर्गंधीयुक्त स्त्राव बाहेर येतो. याला कान वाहने असे म्हणतात. काही सेन्सिटिव्ह व्यक्तींना लिंबू दही. कढी. केळी. लोणचं .आचार.... बर्फ कुल्फी आईस्क्रीम यांची एलर्जी किंवा शरीराला सहन होत नाही . त्म्हणजे चालत नाही. त्यामुळे अचानक रात्रीच्या वेळी कानात ठणका येऊन वेदर होतात ...इत्यादी आजार हे आपण दुर्लक्ष केल्यामुळे नेहमी होतात. आपणच आपले प्रिकॉशन म्हणजे पथ्य नाही सांभाळले तर कानाचे आजार नेहमी कळत नकळत होतात.
नाकाचे आजार
शरीरात नाक हा फार महत्त्वाचा अवयव आहे. तो अति सेन्सिटिव्ह आहे. नाकाचा सर्वात जास्त होणारा आजार म्हणजे ऍलर्जी आहे. लक्षणे --- वातावरणात किंवा खाण्यामध्ये थंड .आंबट .गोड . पदार्थ खाल्ली तर शिंका येऊन नाक वाहते . नाकात चोदल्यासारखे वाटते.. नाकातील एक लाकडी बंद होऊन दुसरी चालू होते किंवा श्वास परिपूर्ण घेता येऊ शकत नाही. हा व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे रोग प्रतिकार क्षमता प्रत्येकाची वेगळी असल्यामुळे कधी कधी हा आजार आपल्या सवयीने सुरूच असतो व औषधाचा नियमित न घेतल्यामुळे बराही होत नाही. नाकात शेंबड्यासारखा सर्दी मध्ये शिंकरल्यावर बाहेर पडतो . कधी पाण्यासारखा पातळ पदार्थ नेहमी येतो . यालाच आपण एलर्जी म्हणतो . एलर्जीचा त्रास वाढल्यास नाकाच्या पाकळ्यांमध्ये पुळ्या.(पालिस ) तयार होतात. त्या टळक होतात अशा वेळी दुर्बिणीच्या साह्याने शस्त्रक्रिया करावी लागते.
काही नवजात बालकांमध्ये नाकाचे हाड वाकडे होते किंवा नाकाच्या आत मध्ये जंतू संसर्ग होऊन नाकाच्या मधील हाड सुजते व त्यातील पातळ पदार्थ द्रव स्वरूपात सतत बाहेर येतो याला सायनोस्यटिंज म्हणतात. कधी कधी नाकाच्या हाडातुन रात्रीच्या वेळी अचानक रक्तस्राव येतो. याला ईपिटक्झिसिस म्हणतात. अचानक अपघातामुळे नाकाच्या हाडाला मुका मार लागल्यास नाकातून रक्त असावेत कधी नाकाचे हाड मोडते. अशावेळी शस्त्रक्रिया करावी लागते.
घश्याचे आजार
घशाला थ्रोट असे म्हणतात. घसा दुखणे. घसा खवखवणे. गिळताना कशाला वेदना होणे. टॉन्सिल वाढणे. ऍसिडिटी मुळे किंवा पित्ताशयामुळे घशात सतत काहीतरी अडकल्यासारखे वाटते. मसाल्याची पदार्थ. चटणी हिरवी मिरची. अति तेलकट. जास्त प्रमाणामध्ये तुपातील पदार्थ सतत खाण्यात आली तर घशात वेदना होतात आणि सूज येते
कधी जिभेवर घशामध्ये छान येतात. जीभ आणि टाळूवर बुरशीजन्य (कॅन्डीडेटिस )आजार होणे . लाळेच्या ग्रथीमध्ये
व थायरॉईड ग्रंथी वाढ झाल्यास घश्याचा कर्करोग होऊ शकतो.
घशाला सप्तपद असे म्हणतात कारण या ठिकाणी दोन अन्ननलिका दोन भ्रमणि आणि दोन नाकाच्या एक खाली जाणारा अन्ननलिकेत जाणारा मार्ग असल्यामुळे घशाचे इन्फेक्शन नेहमी होते. घशात स्वर यंत्र हे श्वासनलिकेच्या तोंडाजवळ असते त्याचे मुख्य कार्य म्हणजे स्वर निर्मिती आणि जेवण करताना श्वासनलिकेत अन्न जाऊन देणे. सॉरी यंत्राच्या दोन मुख्य भाग म्हणजे दोन स्वरताराच्या
कंपनामुळे आपण बोलू शकतो. आपल्या आवाजाची निर्मिती होते. १ ते ६ वर्षे च्या मुलांमध्ये जंतू संसर्गाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे त्यांना थंड आंबट खाल्ल्यामुळे टॉन्सिल आणि. फेरिगडायटिज ग्रंथींचा त्रास नेहमी होत असतो. हीच सर्दी कानापर्यंत सहज पोहोचून कानातून पू येणे . अर्थात सेफ्टीक होणे .( अॅक्युट आओटायटिज मेडिया) हा आजार लहान मुलांमध्ये एलर्जी स्वरूपात होतो. त्यापुढे बाल दमा होत असतो
कधी कधी जन्मतः जिभेला वक्रपणा असल्यास बाळ बोबडे बोलते. त्याला स्पीच थेरेपी द्यावी लागते. कधी बाळाचे ओट
दुभंगलेले असतात. त्यांना बाळ थोडे मोठे झाल्यावर तज्ञ डॉक्टरांकडे नेऊन व्यवस्थित करता येतात.
सर्वसाधारण विचार केला तर आपण पावसाळ्याच्या दिवसात गार हवेत जाऊ नये पावसात भिजू नये तसेच घरामध्ये जास्त चिकन . मटन .मसाला . चटणी . हिरवी मिरची जेवणात घेऊ नये. सतत लिंबू .दही .कढी . केळी .आचार . लोणचे या दिवसात बंद करावी . त्यामुळे आपणास एलर्जी येऊन सर्दी, खोकला . ताप .थंडी येऊन कान. नाक. घसा यांचे संसर्गजन्य आजार निर्माण होतात तेच घरात एकाला असले तर दुसऱ्याला संसर्गामुळे लवकर होतात. पावसाळ्यात लहान मुलांना शाळेत जाताना रेनकोट डोक्यावर प्लॅस्टिकची टोपी हातात छत्री . प्लास्टिकचे गम बूट देऊन पाठवावे. शाळेत जाताना जेवणाच्या डब्यात साधे . फिके . हलके पाचक असे पदार्थ देऊन वॉटर बॅग मध्ये गरम करून थंड केलेले पाणी द्यावे. पावसाळ्यात एसीचा अथवा फॅनचा वापर कमी करावा. अंघोळीच्या वेळी अंगाला डोक्याला वापरण्यात येणाऱ्या साबण ग्लिसरीन युक्त वापरावा. अंघोळीनंतर अंग कोरड्या रुमालाने स्वच्छ पुसावे. कधीही अंतर वस्त्र ओलसर वापरू नये. म्हणजे आपणास त्वचा विकार होणार नाही.
आपणच आपली काळजी घ्यावी ! आपणा होणारा त्रास संसर्गामुळे इतरांना होणार नाही याची काळजी घ्यावी !!
वेळोवेळी आपल्या फॅमिली फिजिशियन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ..... नेहमी सात्विक जेवण घेऊन ! सकारात्मक रहावे.!!
Tags:
आरोग्य