राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त "सामाजिक न्याय दिन" साजरा

      नवापूर सत्यप्रकाश न्युज 
       येथील दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय मध्ये सामाजिक समता, न्याय, बंधुता आणि शिक्षण हक्क यासाठी आपले संपूर्ण जीवन वाहणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २६ जून हा दिवस "सामाजिक न्याय दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर सहायक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार यांच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शालेय स्तरावर वकृत्व स्पर्धांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्याअनुषंगाने दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित, दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे दिनांक २५ जून २०२५ रोजी सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परीख होत्या. सोबत पर्यवेक्षिका श्रीमती निर्जलाबेन सोनवणे यांनी देखील उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून उपशिक्षक श्री उमेश राणा सर आणि श्री महेश राठोड सर यांनी विद्यार्थ्यांचे भाषण मूल्यांकन केले. तसेच सदर कार्यक्रमास शाळेचे इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे देखील उपस्थित होते.
   इयत्ता नववी ते बारावी या गटांमधील एकूण १७ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. सर्व विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय, समतेचा विचार, शाहू महाराजांचे कार्य व आदर्श व्यक्तिमत्त्व यावर अतिशय प्रभावी आणि विचारप्रवर्तक भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून समाजातील विषमता, जातीय अन्याय, शिक्षणाचा अधिकार व बदलते सामाजिक समीकरण या मुद्द्यांवर मार्मिक आणि अभ्यासपूर्ण मते मांडली.
स्पर्धेत कुमारी. नौशीन काझी (इ. १० वी) व कुमारी. प्राची गावित (इ. १२ वी) या विद्यार्थिनींनी आपल्या ओजस्वी व प्रभावी भाषणातून उपस्थितांची मने जिंकली आणि या दोघींना २६ जून रोजी नंदुरबार येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेसाठी शालेय प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गीता राजपूत मॅडम व श्रीमती बिनिता शाह मॅडम यांनी समर्पक व उत्साही पद्धतीने पार पाडले. आभार प्रदर्शन चंद्रकला जाधव मॅडम यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली. 
    या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री संजयकुमार जाधव सर यांचे मोलाचे मार्गदर्शन, नियोजन आणि सहकार्य लाभले. त्यांच्या प्रेरणेमुळेच हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post