प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ राज्यस्तरीय चर्चासत्रात आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे मार्गदर्शन

. मुंबई सत्यप्रकाश न्युज 
   दिनांक 11.06.2025 रोजी सु.ए.सो. चे माध्यमिक विद्यालय कळंबोली येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांचे राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले होते, या चर्चासत्रामध्ये कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून राज्यभरातून आलेल्या प्रयोगशाळा सहायकांचे अनेक प्रश्न समजून घेतले.
   राज्यामध्ये शाळा तिथे प्रयोगशाळा असली पाहिजे आणि प्रत्येक प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहायक हे अत्यंत महत्त्वाचे पद असल्याने आणि विविध प्रयोग करताना त्यांची असणारी गरज लक्षात घेता प्रत्येक शाळेमध्ये शासनाने प्रयोगशाळा सहायक दिले पाहिजे यासाठी कायम प्रयत्नशील राहील तुमचे सर्व प्रश्न मला माहित आहेत मी शिक्षक आमदार आता जरी असलो तरी मी एक उत्तम शिक्षक आहे त्यामुळे माझ्यातला शिक्षक कदापी मरणार नाही, मला माहित आहे की प्रयोगशाळा सहायकाचे किती महत्त्व आहे आणि हे महत्व शासनाला वारंवार सांगून आपले अनेक प्रश्न शासन दरबारी विधान परिषदेमध्ये मांडून आपल्याला न्याय देण्यासाठी हा आमदार आपल्या पाठीशी सदैव असेल याची आपण काळजी आणि चिंता करू नये. आपले सर्व प्रश्न निश्चितपणे सोडविण्याकरिता  हा आमदार प्रामाणिक प्रयत्न करेल असे आश्वासित केले.
    याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परीक्षा कर्मचारी महासंघ चे राज्य अध्यक्ष माननीय भरत जगताप सर, उपाध्यक्ष शिवाजी शिंदे सर, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना रायगड जिल्हा डाकी सर, डी के मात्रे सर, गोसावी सर, बांगर सर, वालगुदे सर, काळे सर, शिरसकर मॅडम, माध्यमिक विद्यालय कलंबोलीच्या उपमुख्याध्यापिका पाटील मॅडम, कीर्तने सर, बरगळ सर, भालेराव सर, भोईटे ,माने सर, चव्हाण सर आणि राज्यभरातील अनेक पदाधिकारी प्रयोगशाळा सहायक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post