नंदुरबार(सत्यप्रकाश न्युज):-
देशभरात 1 जुलै 2024 पासून नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय न्याय संहिता (BNS), आणि भारतीय पुरावा कायदा (BSA) असे तीन कायदयांचा समावेश आहे. नवीन लागू करण्यात आलेल्या फौजदारी कायदयांमध्ये काही कलमे हटविण्यात आली असून काही कलमांचा नव्याने समावेश देखील करण्यात आला आहे. सदर कायदयांमध्ये नवीन कलमांचा समावेश केल्यानंतर अधिकारी व अंमलदार यांना त्याबाबत संभ्रम निर्माण होऊ नये म्हणुन महाराष्ट्र शासनाचे विशेष उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दि. 11 जून 2025 रोजी नवीन फौजदारी कायदयांचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांचे हस्ते नवीन फौजदारी कायदे विषयक जनजागृती कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अति. सरकारी अभियोक्ता एम. वाय. पाडवी, अति. सरकारी अभियोक्ता सत्र न्यायालय, नंदुरबार बी.यु.पाटील, सहा. सरकारी अभियोक्ता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय नंदुरबार सुनिल पाडवी यांनी उपस्थितांना नवीन कायदयांचे बाबत माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमावेळी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील तसेच जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार असे प्रत्यक्ष व व्हीडीओ कॉन्फरन्सिगद्वारे उपस्थित होते.
Tags:
शासकीय