सेवानिवृत्त कर्मचार्याला आपल्या खुर्चीवर बसवून दिला मुख्याधिकारयांनी केला सन्मान

नवापूर  सत्यप्रकाश न्युज 
  येथील नगरपरिषदेच्या आरोग्य विभागात ३१ वर्षे प्रामाणिक सेवा बजावलेल्या श्रीमती कंकु अश्विन ऋषी आज सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाल्या. एक निष्ठावान आणि कर्तव्यनिष्ठ सफाई कर्मचारी म्हणून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शहराच्या स्वच्छतेसाठी समर्पित केले. या भावनिक क्षणी मुख्याधिकारी डॉ. मयुर पाटील यांनी श्रीमती ऋषी यांना स्वतःच्या खुर्चीवर बसवून दिलेला सन्मान हा त्यांच्या कष्टाला दिलेला हृदयस्पर्शी सलाम ठरला. हा क्षण उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला व उपस्थितांनी मुख्याधिकारी डॉ.मयुर पाटील यांचे कौतुक केले व या भावनिक क्षणाचे साक्षीदार झाल्याने गहिवरून देखील आले कारण आजपर्यंत असा सन्मान कोणी केला नाही व कुणाचा झाला देखील नाही.
    श्रीमती कंकु ऋषी यांचा सेवेचा मार्ग हा पुढील पिढ्यांसाठी आदर्शव्रत ठरावा, असे मत अनेकांनी यावेळी व्यक्त केले. नगरपरिषदेच्या वतीने त्यांना स्मृतिचिन्ह व शुभेच्छा देऊन पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व आनंदी जीवनाच्या सदिच्छा देण्यात आल्या. कष्टाची खरी किंमत म्हणजे मुख्याधिकारयांनी दिलेल्या असा सन्मान. श्रीमती. कंकु अश्विन ऋषी यांना सेवानिवृत्तीनंतरच्या नव्या प्रवासासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या. त्याही आपल्याला देण्यात आलेला सन्मान पाहून गहिवरल्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post