नंदुरबार सत्यप्रकाश न्युज
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस वांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील मागील काही महिन्यांमध्ये गहाळ झालेले नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन शोधण्यात नंदुरबार पोलीसांना मोठे यश मिळाले असुन एकुण 107 मोबाईल फोन हे मुळ मालकांच्या ताब्यात परत देण्यात आले आहेत.
पोलीसांनी सी.ई. आय. आर. पोर्टलचे मदतीने मोबाईल ट्रॅकिंगसाठी IMEI क्रमांकाचा वापर करुन विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. यात गहाळ झालेले मोबाईल जिल्हयातुन तसेच जिल्हयाबाहेरुन देखील हस्तगत करण्यात आले. यामध्ये सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या कामगिरी केली आहे.
आज रोजी संवाद हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे हस्ते गहाळ झालेल्या मोबाईलचे मुळ मालक यांना मोबाईल परत करण्यात आले असुन यावेळी नागरिकांनी पोलीसांचे कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करुन आभार मानले आहे. "यावेळी पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले की, मोवाईल हरवल्यास तात्काळ सी.ई. आय. आर. पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करावी व आपले मोबाईलचा IMEI क्रमांक जपून ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरुन मोबाईलचा शोध होण्यास मदत होईल."
सदर कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील तसेच इतर अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते.
Tags:
शैक्षणिक