येथील पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील गुरुवारी (ता. १२) रुजू झाले. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांची छत्रपती संभाजीनगरला बदली झाली. त्यांच्या जागी नव्याने पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील रुजू झाले. नवापूर पोलिस ठाण्यात गेली अडीच-तीन वर्षांपासून स्थिर अधिकारी मिळत नव्हते. पोलिस निरीक्षक पाटील युवा अधिकारी आहेत. नवापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, नवापूर शहरात व तालुक्यातील अवैध व्यवसाय, युवकांची दबंगगिरी, अवैध मद्य तस्करीला आळा, तसेच शहरातील वाहनांच्या अनियमित पार्किंगमुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतो त्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होईल, अशा पोलिस निरीक्षक पाटील यांच्याकडून नागरिकांना अपेक्षा आहेत.
Tags:
शासकीय