करसल्लागार नितीन डोंगरे प्रतिष्ठित एमटीपीएचा सर्वोत्तम मित्र पुरस्काराने उद्या सन्मानित होणार

कोपरगांव सत्यप्रकाश न्युज 
 उत्तर महाराष्ट्र करसल्लागार प्रॅक्टिस असोसिएशनचे अध्यक्ष व कोपरगांव येथील नामांकित करसल्लागार नितीन डोंगरे यांना 
महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एमटीपीए)  असोसिएशनमधील  उत्कृष्ट योगदानासाठी, व्यवसायातील  समर्पणासाठी आणि समाजासाठी  अनुकरणीय सेवेसाठी तुमची "एमटीपीएचा सर्वोत्तम मित्र" म्हणून निवड झाली आहे हे कळवण्यास आम्हाला आनंद होत आहे. हा सन्मान तुमच्या कठोर परिश्रम आणि वचनबद्धतेबद्दल आमची खोल कृतज्ञता दर्शवितो.
  हा पुरस्कार एमटीपीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) दिनांक १५ जून २०२५ रविवार रोजी  सकाळी ११:०० वाजता ज्ञानमंदिर हॉल, यादव व्यापार भवन, पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.असे संस्थेचे अध्यक्ष प्रसाद देशपांडे यांचे सहिचे पत्र प्राप्त झाले आहे.
 

Post a Comment

Previous Post Next Post