आजच्या आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईच्या बटव्यात निरूत्साह, निराशा, अपयश, भिती,या विषयावर डॉ एम.बी.पवार यांचे मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी नाशिक

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
आरोग्य धनसंपदा  सदरातील आजीबाईचा बटवा 
 मी सौ सरिता निनावे. पाटील वाडा . हिंगणघाट ......
विषय - निरूत्साह, निराशा, अपयश, भिती,या विषयावर मार्गदर्शन करावे 
     जीवनात अनेकांना सतत निराशा असते ‌. त्यांना समोर व्यवहारात नेहमी धोके दिसतात. आपले भविष्य काळ कुठे आहे ? असे नेहमी वाटते .असा झटका अनेकदा माणसांना आपोआप येतो . हा मनात निराशेचा प्रवेश अतिशय किरकोळ कारणाने होतो. त्यामुळे त्याला आयुष्याचा डोंगर चढणे कठीण होते . किंवा डोंगरावरून आपली गाडी घसरली,तर ती सुरळीत व्हायला वेळ लागेल. माणसाच्या मनात त्याचा विचारच निराशा आणि निरोत्साह निर्माण करतो. त्यामुळे तो मनातील हिम्मंत सोडून सतत रडत बसतो. 
      खरं म्हणजे -- आजच्या तरुण-तरुणींनी आपल्या जीवनाबद्दल आशावादी असेल हवे. पण आजचे तरुण आशा . महत्त्वाकांक्षा मनात ठेवत नाही. त्यांच्याभोवती परिस्थिती अनुकूल असते. कारण सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे . एखादा तरुणाला स्पर्धा करत आहेत ? नाही -- मग तो मनात नेहमी निराशा बाळगतो. परीक्षेत पेपर मध्ये सर्व लिहिता येते. पण ऐनवेळी महत्त्वकांक्षा कमी होते. त्यामुळे तो उत्तर येत असून व्यवस्थित लिहू शकत नाही .आणि मनात वाईट विचार येऊन भीतीपोटी तो आत्महत्या करायला तयार होतो. वास्तविक हे भेकडपणाचे लक्षण आहे. खरं म्हणजे अपयशाचे कारण निराशा ही असते 
      व्यक्ती जर व्यापार करत असेल तर त्या व्यापारात लक्ष देऊन सातत्य ठेवून, जिद्द वाढवून, निराशा कमी करणे, आपल्या हातात आहे. अनेक माणसांना भीतीमुळे निराश मनस्थिती आणि दडपलेल्या अपयशाच्या भावना जीवनात प्रगती करू देत नाही .
        माणसाने नेहमी कोणत्याही गोष्टीत लढायची जिद्द हवी. महत्त्वाकांक्षा आणि सातत्य असेल तर आकाश ठेगणे वाटते. त्याच्या मनात विजय प्रथम मिळून वैभव आणि भरभराट सुरू होते. हताश आणि निराश माणसांना वैभव मिळत नाही. व्यक्तीच्या प्रगतीत नेहमी खाच- खळगे 
 असतात. त्यामुळे त्यांना अनेक शंका उत्पन्न होतात . आपल्या कामाचे पद्धत चुकली तर नाही ना ? अशी शंका येऊन. ते व्यवहारात नेहमी भितात ..घाबरतात. 
             आपण नेहमी यशस्वी माणसाशी मैत्री करा. त्यांना विश्वासात घ्या. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी अवलोकन करा . आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या लोकांचा नेहमी सन्मान ठेवा . त्यांना आदर्श माना. त्यांच्यामुळे आपल्याला यश प्राप्त होते. जीवन जगणे अधिक सुखी आणि समाधानी होते .त्यामुळे आपले मन आनंदी आणि उत्साही व प्रेरणादायी होते. आपल्या मनात वैभव मिळण्याची तिव्र ईच्छा असेल. तर आपण शंभर टक्के वैभव संपन्न होऊन नेहमी निरोगी राहू शकतो. 
     जीवनात अभ्यासाने आशावादी , स्वावलंबी, कर्तृत्ववान,मेहनतीने, सकारात्मक वागल्याने, माणसाचे मन आणि आशा वाढत असतात . आपण नेहमी आशा आणि उत्साह सोडता कामा नये. ज्याच्या मनात आशेचा शेवट जागा आहे . तो आयुष्यात नेहमी यशाचा लढाईत जीवन नौकेचा कर्णधार होईल. 
      मानवी मन हे निराशेने भीतीने ग्रासलेले आहे . ते माणसाच्या चेहऱ्यावरून समजते. कारण तो एक आपला आरसा लोकांना प्रदर्शन करणारा आहे. माणसाचे अपयश त्याच्या चेहऱ्यावर , त्याच्या डोळ्यावर /त्याच्या गालावर /त्याच्या हनुवटीतील भावभावना याच्यावरून समोरील व्यक्तीला वाचता येते. तुमच्या मनात आशा आहे की निराशा भीती आहे? की उत्सव --  हे तुमचा चेहरा बोलतो.?
     माणसाचा सर्वात जास्त छळ निरुत्साह,भिती, नाराजी,शंका,हे मनात निर्माण करतात. व्यक्तीला निराश ठेवण्याचे काम मनाच्या विचारावर अवलंबून असते. प्रथम आपला विश्वास आपल्यावर ठेवा. मी आपला बरोबर आहे. मी कधी चुकत नाही ? मला अपयश येणार नाही ?अशी भावना मनात ठेवा. आपल्याला यश फार जवळ आहे . फक्त सकारात्मक वागा. मनात सुंदर इच्छा निर्माण करा. सर्व आपोआप मिळते . फक्त प्रयत्न करणे आपल्या हातात आहे . अशी जिद्द ठेवा ? आपण यशस्वी व्हाल. 
       आपण आपल्या समाजासमोर, नातेवाईकांसमोर, मित्रांसमोर आपले राहणीमान स्वच्छ सुंदर सदा हसत ठेवा.. आपण नेहमी स्वच्छ सुंदर दिसणे  महत्त्वाचे  आह.रोज दाढी करा, चेहऱ्यावर पावडर लावा , केसाना तेल लावून भांग पाडा. कपडे साधे पण फिकट रंगीत किंवा लायनिंगचे वापरा. जमल्यास बाहेर जाताना शर्ट इन करा चप्पल अथवा बूट वापरा. कोणाशी बोलताना गालात आणि ओठात स्मितहास्य करा. जणू काही आपण एकमेकांचे सखे जवळचे नातेवाईक आहोत . असा भास निर्माण करा. असे केल्यास यश फार जवळ आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीला समजून घ्या.... कधीही आपण आपले म्हणणे कुणाला प्रेशर ने बोलू नका. समोरच्या व्यक्तीचे प्रथम म्हणणे ऐकून घ्या. विनोदी शैलीने बोला. दुसऱ्याचे दुःख समजून घ्या. आपल्यावर आत्मविश्वास ठेवा. मी हे काम करीनच..... धाडस केल्याशिवाय आणि हिम्मत आणि धैर्य असल्याशिवाय आपण महान होऊ शकत नाही ? याची जाणीव ठेवा. 
               आपल्याजवळ कितीही औषधाचा साठा असला तरी काही उपयोग नाही. मेडिकल सायन्स ही एक शरीरावर उपचार करणारी पद्धत आहे. यामध्ये मुळात आताच्या जगात औषधाचा उपयोग जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात माणसं करतात. कारण शरीराची सहनशक्ती कमी होत आहे. याला कारण आपली  जीवनशैली फार बदलली आहे. त्यामुळे प्रत्येक रोगजंतू आपल्यावर हल्ला करीत आहे. आपले खाणं.पिणे.‌ वागणे यात फार बदल झाला आहे. रोगाची संकटे येण्यासाठी माणसं शरीरात मोर्चे बांधत आहेत . त्यांना ऍसिडिटी ची, हृदयाची, ताण तणावाची, अशक्तपणाची नेहमी भीती वाटते.
        बाळ लहान असताना आई आपल्या बाळाला नेहमी प्रेमापोटी भीती, चिंता हे विकार वाढीस लावते . उदाहरणार्थ बाळ बाहेर जाऊ नको ? ऊन लागेल अरे थंडी आहे . डोक्याला मफलर अंगात स्वेटर. पावसात गेलास तर सर्दी होईल डोकं दुखेल ? ताप येईल . इत्यादी विकार हवामानाचा चळवळ तयार होत असताना आई बाळाला भीती उत्पन्न करते . सर्दी खोकला झाला तर डॉक्टर कडे नेऊन पटकन औषध देते. अशी भीती बाळास निर्माण होते. खरं म्हणजे आजारपणाला प्रतिकार करण्याची शक्ती निसर्गाने माणसाला दिली आहे. अतिशय किरकोळ करण्यासाठी अनेकांना डॉक्टर कडे धाव घेण्याची गरज भासते. कारण त्यांचा स्वतःवर विश्वास नसतो .कधीकधी काही माणसे जुनाट आजारासाठी गल्लीतल्या गंडेदोरे टाईप करणारे . विभूती देणारे बाबा लोकांकडे जातात . वास्तविक अशा आघोरी उपचाराने मानवी शरीरावर काही परिणाम होत नाही . पण हेच जीवनात निरुत्साह भीती काळजी अपयश नेहमी निर्माण करतात. 
           व्यक्ती नेहमी संकट रोग अपघात यांची सतत शंका घेत राहिले . तर त्यांना स्वाभाविक जीवन जगता येत नाही . स्वतःच्या अंतरंगात काय आहे हे त्यांना कळत नाही माणसाने मनातील वाईट विचार नेहमी बाहेर टाकले पाहिजे आपण नेहमी संकटाचा सामर्थ्य दिले पाहिजे त्यामुळे या शंका / भीती आपोआप नष्ट होते. माणसाला कधीही कोणतीही संकट येत नाही . पण तो भीतीमुळे अपयशाने स्वतःचे नुकसान करतो. आपल्या मनातील जागृतीच्या सकारात्मक विचार असतील तर तुमचं भवितव्य तुम्हीच घडवतात. आपले विचार परिवर्तन आरोग्य आणि प्रसन्नता ही फार महत्त्वाची आहे . नेहमी मनात जनकल्याण आणि शुभविचार बाळगल्यास संकटाचा लवलेशही दिसणारी नाही.आपण निरोगी रहाल......
                   
               

Post a Comment

Previous Post Next Post