येथील श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए एम व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर येथे इको क्लब अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात संस्थेचे सदस्य परागभाई ठक्कर,प्राचार्य मिलिंद वाघ, माता पालक प्रितीताई पाटील,उपमुख्याध्यापक नारायण मराठे, पर्यवेक्षक दीपक मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालय विभागाच्या विभाग प्रमुख मेघा पाटील व सर्व शिक्षक बंधू-भगिनी व इको क्लबच्या विध्यार्थ्यांच्या समवेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण करून केंद्र सरकारच्या 'एक पेड माँ के नाम' या अभियानास प्रोत्साहन देऊन वृक्षप्रेम वाढवून वृक्षसंवर्धन करण्यास प्रवृत्त करणे हा यामागचा उद्धेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य मिलिंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली इको क्लब च्या सर्व सदस्यांनी व सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..
Tags:
शैक्षणिक