'नव क्षितीज नव आकाश, नवीन वर्षाची खास सुरुवात' या प्रमाणे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात करण्यासाठी श्रीमती प्रतापबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल व हाजी ए.एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर, जि. नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या आयोजनामागे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आकर्षण निर्माण करणे, पालकांमध्ये विश्वास वाढवणे आणि शिक्षणाचे महत्व अधोरेखित करणे हा उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक कनिष्ठ महाविद्यालय विभागाच्या विभाग प्रमुख श्रीमती मेघा पाटील व सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी नवोदित विध्यार्थी, पालकवर्ग व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी सरपंच पालक, तसेच विविध गावातील व शहरातील पालक, तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक मिलिंद वाघ यांनी आपल्या भाषणात गुणवत्तापूर्ण शिक्षण, शालेय कामकाज, शाळेतील भौतिक साधन सुविधा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी
बँडवर एका तालात एका सुरात पथसंचालनाद्वारे आपले कला-कौशल्य सादर करत वर्गात प्रवेश केला.
शाळा प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती ओढ निर्माण झाली असून शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश महाजन यांनी केले तर आभार अमोल दिवटे यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले..
Tags:
शैक्षणिक