ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असुन आपल्या प्रकृती कडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे मत शहराचे माजी नगराध्यक्ष व उद्योगपती विपिनभाई चोखावाला यांनी व्यक्त केले.
शहरातील महात्मा गांधी पुस्तकालय सभागृहात ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा आयोजित केली होती. खेळीमेळीच्या वातावरणात ज्येष्ठ नागरिकांची सभा पार पडली. सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक तथा माजी नगराध्यक्ष विपिनभाई चोखावाला उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत, सत्कार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोर दलाल, शिरीष शहा यांनी केले. सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मागील सभेतील कामकाजाचा अहवाल सादर केला. त्यानंतर सध्याच्या महिन्यातील कामांचा आढावा घेण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या, सामाजिक सुरक्षा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम यासारख्या विषयांवर + सदस्यांनी विचार व्यक्त केले.
सभेला नागरीक ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते.ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. नियमित आरोग्य तपासण्या डॉक्टरांकडून करून घ्याव्यात. त्यामुळे संभाव्य आरोग्य समस्या लवकर ओळखता येतील. स्वतःच्या आरोग्याची आणि मानसिकतेची काळजी घेणे, हे सर्वात महत्त्वाचे आहे, असा सल्ला विपिनभाई चोखावाला यांनी मनोगतातून दिला. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यावर उपायाविषयी शिरीष शहा यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत प्रमुख पाहुण्यांचा परिचय सुरेश पाटील यांनी करून दिला. सूत्रसंचालन तथा आभार सुरेश पाटील यांनी मानले.
Tags:
सामाजिक