2024-2025 करदात्यांना गोंधळात टाकणारे ITR मेसेजेस – सावध व्हा! -करसल्लागार नितीन डोंगरे

.  कोपरगांव- सत्यप्रकाश न्युज 
2024-2025"Dear Taxpayer, your ITR for A.Y. 2025-26 is pending as per records. Please file it at your earliest on All India ITR: https://www.allindiaitr.com/app"
 अशा स्वरूपाचे मेसेजेस सध्या देशभरातील अनेक करदात्यांच्या मोबाईलवर येत आहे.
अनेकांना वाटतं की, हा मेसेज आयकर विभागाकडून पाठवण्यात आला आहे आणि त्यामुळे ते गडबडीत रिटर्न फाईल करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सत्य हे आहे की आयकर विभागाने अद्याप अधिकृतरीत्या A.Y. 2025-26 साठीची ITR युटिलिटी सुरू केलेलीच नाही.
   काय आहे नेमका प्रकार?
अशा प्रकारच्या मेसेजेसमागे काही खाजगी कर सेवा पुरवठादार कंपन्या असतात. त्या वैयक्तिक डेटाबेसवर आधारित मेसेजिंग करून स्वतःचे मोबाइल अ‍ॅप्स किंवा पोर्टल्स वापरण्यास भाग पाडतात. यातून त्यांना क्लायंट मिळवता येतात, पण त्यामुळे सामान्य करदात्याच्या मनात भीती आणि गोंधळ निर्माण होतो.विशेषतः ग्रामीण भागातील करदात्यांना यामुळे मनस्ताप होतो.
यामागील धोके:
1) फसव्या लिंकद्वारे डेटा मिळवण्याचा प्रयत्न
2) चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते
3) अधिकृत युटिलिटी नसताना रिटर्न फाईल करणे ही अर्धवट प्रक्रिया ठरू शकते
4) करदात्यांमध्ये विभागाविषयी गैरसमज आणि भीती निर्माण होते
आयकर विभागाकडून काय स्पष्टीकरण?
आयकर विभाग नेहमीच www.incometax.gov.in या अधिकृत पोर्टलवरूनच रिटर्न भरण्यासाठी युटिलिटी जारी करतो. यावर्षीही जूनअखेरपर्यंतच अधिकृत फॉर्म आणि युटिलिटी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधी आलेले कोणतेही मेसेजेस हे खाजगी कंपन्यांचे प्रचारात्मक संदेश आहेत, हे करदात्यांनी लक्षात घ्यावे.
 काय करावे करदात्यांनी?
अशा मेसेजेसकडे भीतीने पाहू नका,
अधिकृत युटिलिटी येईपर्यंत थांबा,
आपल्या कर सल्लागाराशी सल्लामसलत करूनच पुढील निर्णय घ्या आणि
कोणतीही माहिती फॉर्मल पोर्टलशिवाय शेअर करू नका. फसव्या अ‍ॅप्स, लिंक्स याबाबत सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
आयकराची करप्रणाली डिजिटल झाली खरी, पण त्यासोबत फसव्या प्रथा आणि दिशाभूल करणारी विपणन यंत्रणाही वाढली आहे. म्हणूनच करदात्यांनी अधिकृततेची खात्री करूनच पुढील पावले टाकावीत. तुमचा डेटा, तुमचा हक्क – शहाणपणाने वापरा.
         -   नितीन दत्तात्रय डोंगरे
                  अध्यक्ष
      नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स       असोसिएशन

Post a Comment

Previous Post Next Post