नवापूर सत्यप्रकाश न्युज
राज्यासह नंदुरबार जिल्ह्यात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोराने सुरू असुन आता फक्त निवडणूक जाहिर होण्याची वाट पाहिली जात आहे कधी एकदाची निवडणूक जाहिर होईल आणि आम्ही भावी चे विद्यमान नगरसेवक कधी होउ याची प्रतिक्षा आता या भावी नगरसेवकांना झाली आहे व काही तर कामाला देखील लागले आहेत.
होय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका हि एक देखील संस्था असून नवापूर नगरपालिका गेल्या कित्येक दिवसांपासून प्रशासक आपले काम बघत असले तरी शहरातील काही समस्या यथावत आहे तर काही सुटल्या आहेत सध्या नगरसेवक नसल्याने नागरिक आपली समस्या निवेदन देऊन किंवा पालिकेत जाऊन स्वतः सोडवून घेत आहेत व प्रयत्न देखील करत त्यामुळे नगरसेवक जरी नसला तरी आमच्या समस्या आम्ही सोडवु शकतो व त्या देखील नगरसेवक नसतांना तर आम्हाला निवडणूक नको आमच्या समस्या आम्ही सोडवु व प्रशासन देखील सहकार्य करेल म्हणून निवडणूक नको असे म्हणणारे देखील मतदार आहेत आणि मतदार जागृत झाल्यामुळे प्रशासन देखील दुर्लक्ष करत नाही अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
नवापूर शहरातील एक प्रभाग असा आहे की तीथे No Repet (आता पुन्हा नाही) अर्थात एकदा विजयी झालेला उमेदवार दुसऱ्यांदा विजयी होत नाही म्हणून आता पुन्हा नाही अशा मताचे मतदार असल्याने एका उमेदवाराला पुन्हा संधी दिली जात नाही.
हा प्रभाग शहरातील अत्यंत जुना व मोठा असुन या प्रभागात घरातील दोन मतदार असतील तर ते वेगवेगळ्या बुथ वर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावून आपला उमेदवार विजयी करतात त्यामुळे या प्रभागात दोन नव्हे तर चार नगरसेवकांना या मतदारांनी विजयी केले आहे.
या प्रभागात आतापर्यंत स्थानिक एक दोन उमेदवार वगळता बाहेरच्या उमेदवारांना देखील संधी दिली असून परंतु दुसऱ्यांदा संधी दिली गेली नाही सध्या या प्रभागात जवळ जवळ 20 ते 25 लोकांच्या नावाची जोरदार चर्चा असून प्रत्येक इच्छुक उमेदवार आपापल्या परीने प्रभागाची सेवा करतांना दिसत आहे तर प्रभागात होणारया कार्यक्रमात गैरहजर असणारा देखील प्रत्येक कार्यक्रमात आवार्जुन हजेरी लावताना दिसत आहे.
सध्या या प्रभागाकडे उमेदवारी साठि सर्व राजकीय पक्षांसह अपक्ष म्हणून माजी नगरसेवक, शिक्षक, पत्रकार, विविध संस्थाचे पदाधिकारी, साहित्यिक तसेच महिला वर्ग देखील जोमाने कामाला लागला प्रत्येक भावी नगरसेवक आपले काम अत्यंत गोपनीय पद्धतीने करत असुन प्रत्येकाला विश्वास आहे की या प्रभागाचा नगरसेवक तर मीच अशी भाषा देखील बोलली जात आहे तसेच प्रभागातील मतदारांना वेळोवेळी मदतीसाठी आज तरी सर्व तत्पर आहे म्हणून कल किसने देखा म्हणत मतदार देखील आपल्या समस्यांचे निराकरण या भावी नगरसेवकांकडून करून घेतांना दिसत आहे.
सध्या या प्रभागात समस्या नसल्या तरी या प्रभागात काहि जागृत मतदार आपली समस्या आपल्या परिने सोडवुन घेत असला तरी प्रभागाला नगरसेवक निवडून देणे गरजेचे आहे आणि योग्य उमेदवाराला संधी द्यावी यासाठी स्थानिक व्यक्तीला संधी द्यायची का बाहेरच्या एखाद्या चांगल्या उमेदवार जो हाक मारताच धावत येईल अशा उमेदवारांला पुन्हा संधी द्यायची याची देखील गोपनीय चर्चा सध्या सुरू आहेत परंतु प्रभागातील काही मान्यवर व्यक्ती सांगतील एखाद्याचे नाव सुचवतील त्याचा सुध्दा विचार केला जाईल अशी देखील मतदारांकडून बोलले जात आहे.
आता फक्त प्रतिक्षा एवढिच की निवडणूक आयोग कधी निवडणूक जाहीर करेल आणि NO REPEAT (आता पुन्हा नाही) अशा प्रभागात मतदार कोणाला संधी देतील याची.
Tags:
राजकीय