येथे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) नवापूरच्या वतीने दिनांक ५ जुलै २०२५ शनिवार रोजी श्री जगन्नाथ भगवान यांची भव्य रथयात्रा पार पडणार आहे. या रथयात्रेची सुरुवात दुपारी २ वाजता श्री हनुमान मंदिरापासून होणार असून, संपूर्ण नवापूर शहरात ती मोठ्या भक्तिभावाने काढण्यात येणार आहे. तरी प्रचंड संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित रहावे.
या यात्रेत रथ ओढण्याला विशेष महत्त्व असून सहभागी सर्व भक्तांनी रथ ओढण्याचा लाभ घ्यावा अशी संधी भविष्यात कधीतरी प्राप्त होणार आहे म्हणून नवापूरच्या सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संधी चे सोनं करावयाचे आहे.
शोभायात्रा दुपारी २ वाजता हनुमान मंदिर- गांधी पुतळ्यापासून निघणार असून
गांधी पुतळा हनुमान मंदिर → मेन रोड लाईट बाजार → सरदार चौक → राम मंदिर गल्ली → गुज्जर गल्ली → आंबेडकर चौक → बस स्थानक मार्ग → टाऊन हॉल, असा मार्ग राहणार आहे नवापूर शहरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Tags:
धार्मिक