नवापूरचे भुमि पुत्र नरेंद्र खैरनार सुरत येथे समाज भुषण पुरस्काराने सन्मानित

.    नवापूर सत्यप्रकाश न्युज 
     येथील भुमी पुत्र व सध्या सुरत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सुरत येथील डि.ए.व्हि हिंदी विदयालय व त्यानंतर सार्वजनिक मराठी हायस्कूल नवागाम डिंडोली येथे ज्ञानदानाचे कार्य करणारे नरेंद्र यशवंत खैरनार यांना आज सूरत येथे क्षत्रिय शिंपी समाज आयोजित संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवनी समाधी सोहळा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात समाज भुषण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
    नरेंद्र खैरनार यांनी आपल्या अध्यापन कार्यासह समाज कार्यात नेहमी अग्रेसर असुन शिंपी समाजाचे मुखपत्र नामविश्वाचे ते सध्या सहसंपादक म्हणून काम पाहत आहेत तसेच सामाजिक, धार्मिक,व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा नेहमीच मोठा वाटा असतो समाजकार्य व धार्मिक कार्याचा आपले पिताश्री यशवंत उखाराम खैरनार यांचा वारसा ते पुढे चालवित असुन त्यांच्या विविध कामांचे बक्षीस म्हणून आज त्यांना गौरविण्यात आले.
    सदर पुरस्कार त्यांना  समाजध्यक्ष प्रकाश मेटकर , प्रकाश शिंपी ,नाना ईसइ आदिंचा उपस्थितीत देण्यात आला.
    सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्राप्त होत आहे.
    

Post a Comment

Previous Post Next Post