भारतीय रिझर्व बँक व वरिष्ठ महाविद्यालय नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २५ जुलै २०२५ रोजी वित्तीय जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय रिझर्व बँकेच्या मुंबई येथील लोकपाल योजना विभागाकडून महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व व्यापारी तथा औद्योगिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अलिकडे सायबर गुन्हे वाढीस आले आहे. या पार्श्वभूमीवर देखील उपस्थितांना माहिती देऊन मार्गदर्शन केले जाणार आहे.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता नवापूर येथील रेंटियो फुड्स च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल वाणी यांच्या हस्ते तथा आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष आ. शिरीषकुमार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात येईल. तीन सत्रात भारतीय रिझर्व बँकेचे तज्ञ अधिकारी या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील. महाविद्यालयात अश्या महत्वपूर्ण कार्यशाळेचे प्रथमच आयोजन होत असल्याने प्राचार्य डॉ. दिपक जयस्वाल यांनी विविध समित्या गठीत केल्या असून कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विविध आघाड्यांवर जय्यत तयारी केली जात आहे.
Tags:
शैक्षणिक