आरोग्य धनसंपदा सदरातील आजीबाईचा बटवा
विषय - निरुत्साह. आळस . कंटाळा म्हणजे काय ?
सौ अलका चौरे . वय- ५७ वर्ष. मेन रोड. राजापूर. जिल्हा - नांदेड.
खरं म्हणजे ! हा एक शरीरातील मानसिक आजार आहे. जीवनात अनेकांची मने सतत निराशा असतात. अशा निराशा जनक व्यक्तींच्या कार्यात नेहमी अडथळे येतात त्यांना सतत धोके दिसतात. अशा माणसांची मने नेहमी आजारी असतात. त्याचा मनावर फार परिणाम होतो त्यामुळे अशा व्यक्तींचे आयुष्य आपोआप कमी होते. जीवनात व्यक्तीला पुष्कळ वेळा निराशेचे झटके येतात. याला कारण नकारात्मक स्वभाव. आणि भीती हे होय. हा निराशेचा बगळा फार घातक असतो एकदा जर डोंगरावरून गाडी घसरली तर पायथ्याला येण्यास फार वेळ लागत नाही.
व्यक्ती जर रिकामी किंवा काही काम नसल्यास कोणताही विचार अचानक समोर येतात . त्या त्या विचारांची सत्यता न शोधता आपणच एका बाजूचा विचार करतो. त्या
विचारांची पलीकडील बाजू शोधत नाही. अ वाजवी विचारांमुळे मानसिक स्थिती भीतीदायक. चिंता युक्त. विपर्यास मनस्थितीत जाऊन एखाद्या व्यक्ती आपल्या निराशेपोटी आत्महत्या करतो. पण सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे . अपयशी यशाची पहिली पायरी असते. असे जर शोधले तर तरुण-तरुणी नापास झाल्यास आत्महत्या करू शकत नाही. पण ज्या व्यक्ती अति सेन्सिटिव्ह. वैचारिक जीवनात असतील तर वाईट कृत्य सहज घडून जगातून निघून जातात.
अनेकांना निराश होण्याची सवय असते. भीती निर्माण होते. त्याला कारण मनस्थिती स्थिर नसणे. स्वभाव हट्टी असणे. कोणाचे ऐकून न घेणे. घरातील चार भिंतींच्या आतील वातावरण निर्मिती ही मुलांच्या जीवनातील संस्कार यावर अवलंबून असतात. त्यामुळे आई-वडिलांनी बाळाच्या बाल वर्गापासून घरातील वातावरणात संताप. वैचारिकता. भांडण. तंटे. रागवणे. भुताचे गोष्टी. अंधश्रद्धा. अशा गोष्टी सांगू नये. जेणेकरून बाळाच्या बुद्ध्यांकावर जीवनात परिणाम होत असतो. त्यामुळे काही व्यक्ती सतत भितात. विचार करतात. जीवनात पुढे जात नाही. चार चौघात बोलत नाही. अशी प्रवृत्ती ही वयाप्रमाणे वाढत जाते. त्यामुळे मनात जडलेल्या मनस्थितीमुळे भीतीच्या कारणाने आर्थिक संकट येतात.
माणसांना जर अशक्तपणा . पचन संस्था बंद. विटामिन ्स ब-१२ कमतरता. टायफाईड .ऍसिडिटी. क्षय आजार. कॅन्सर. इत्यादी असल्यास कधी कधी भूक लागत नाही. पचनशक्ती बंद होते. त्यामुळे शरीरात आळस येऊन उत्साह कमी कमी होतो. कोठ्यात ताप असतो. हातपाय कंबर मान पाठ सतत दुखते. डोकेदुखी निर्माण होऊन. . झोप लागत नाही . वैचारिकता वाढते. कुणाकडेही व्यक्ती संशयाने बघते. अचानक संताप येतो. मानसिक संतुलन बिघडते. समोर नेहमी अपयश डोळ्यासमोर येते. एक प्रकारे हा मानसिक आजार व्यक्तीला आपोआप निर्माण होतो.
खरे म्हणजे माणसाला विजय प्राप्त करण्यासाठी
मनामध्ये सकारात्मक विचार. कोणतीही गोष्ट शिकण्याची आवड. सतत बोलणे. हसणे. या गोष्टीमुळे आपली भरभराट होऊन आपणास वैभव प्राप्त होते. कधीही हताश आणि निराश माणसाला वैभव मिळत नाही. काहींना स्वतःच्या लायकी विषयी आणि योग्य ते विषय संशय असतो. या संशयामुळे माणूस प्रगतीच्या मार्गावरून भलतीकडेच भटकतो. माणूस जेव्हा हिम्मत सोडून बसतो तेव्हा त्याला कोणतेही कार्य पूर्ण करता येत नाही. निराश मनस्थितीमुळे दरिद्र वाढून स्वतःभोवती व्यक्ती दुःखाचे चक्र तयार करते. त्यामुळे भरभराट आणि समृद्धी त्याच्यापासून फार दूर जाते.
कधी कधी अनेक व्यक्ती एखादा कार्याचा शुभारंभ मोठ्या उत्साहाने करते. त्याला असे वाटते की आपण लगेच करोडपती व्हावे. यशस्वी व्हावे. पण प्रत्येक गोष्टीला वेळ काळ असतो. त्या वेटिंग च्या काळात पैसे कमी मिळाल्यास तो नाराज होतो. मग ती व्यक्ती अनेक संकटांना . अडचणींना सतत घाबरतो. आपण अपयशी झालो. आपल्या कामाची पद्धत चुकली तर नाही ना ? असा तो विचार करतो. मग निरुत्साह होऊन आळशी आणि कंटाळा आपोआप स्वतः निर्माण करतो. आपल्या जन्मपत्रिकेतील ग्रह तर बदलले नाही ना? अशी त्याला शंका येते. मग ते कार्य तो अर्ध्यावर सोडून देतो. जीवनात त्याचे नुकसान होते. तो अपयशी होतो.
जीवनात नेहमी यशस्वी माणसाची मैत्री करा. त्यांच्यासोबत नेहमी बोला. बसा. त्यांचे विचार समजून घ्या. त्यांच्याविषयी आदर करा. आपल्याला नेहमी ते चांगले विचार सांगतात. त्यामुळे आपले मन आनंदी राहून प्रेरणा निर्माण करतात तुमची प्रगती वेगाने होते तुम्हाला नाना प्रकारचे सुख मिळून वैभव आपोआप मिळते. आपण नेहमी चांगले विचार सकारात्मक जीवन जर जगले तर जीवनातील वैभव आपोआप आपल्याकडे चालत येते.
जीवनात आशा . अपेक्षा ही एक चुंबकीय शक्ती आहे . आपले मन सवयीने आणि अभ्यासाने आशावादी ठेवून विचार बळकट करून प्रयत्नवादी असेल तर यश आपोआप आपल्या जवळ येते. एखाद्या वेळी अन अपेक्षित संकट आले तर थोड दरिद्र येऊन वैभव सोडून जाईल तरीही तुम्ही उत्साह आणि आशा अपेक्षा सोडता कामा नये.. हेच आपले खरे भांडवल आहे. प्रकृती बिघडली तरी मनात जीवन नौकेचा कर्णधार आशा जर सकारात्मक ठेवली तर आपली भरभराटी आणि प्रगती निश्चित होते. आपला चेहरा हा समाजाला. समोरच्या व्यक्तीला दिसतो. आपल्या चेहऱ्यावर संपूर्ण व्यक्तीचे भविष्य लिहिले आहे. हे सर्व जगाला कळतंय. मनुष्य किती खोटे बोलतो. हा किती लबाड आहे. हा किती मतलबी आहे. हे माणसाचा चेहरा सांगतो.
आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला ओळखा. मी हे काम करीत. मला परीक्षेत 95 टक्के मार्क मिळतील. मला या कामात यश आहेच. मी सतत चांगले वागेल चांगले बोलेल असे ठरवले आणि सोबत हिम्मत आणि धैर्य घेतले तर अपयश कधी आपल्या नशिबात येणार नाही धाडस केल्याशिवाय आत्मविश्वास निर्माण होत नाही. उत्साहाने काम केल्यामुळे आपल्याला हळूहळू बढती मिळते. रात्री झोपताना गेलेल्या गोष्टींचा विचार करू नका. पण येणाऱ्या भविष्याचा विचार करा. मी करोडपती कसा होणार ? आपल्या नोकरीमध्ये किंवा धंद्यामध्ये प्रगती कशी निर्माण होणार. कारण गिऱ्हाईक हा खरा देव असतो. या देवाची सतत चांगले बोला चांगले वागा चांगले विचार त्याला द्या समजून सांगा म्हणजे आपले यश आपल्या हातात आहे. चांगले विचार हे जगाला आवडतात. त्यामुळे आपला चेहरा आपोआप सुंदर आणि छान होतो. यश आपल्या जवळ आहे. त्यामुळे आपल्या प्रगतीमध्ये वाढ होते.
उत्साह वाढवा. यश फार जवळ आहे यशाचा मार्ग आत्मसात करण्यासाठी मनात सतत चांगले विचार ! आचार ठेवा
Tags:
आरोग्य