आज दिनांक १२.०८.२०२५ रोजी मा.ना. श्री. दादाजी भुसे, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य व मा. श्री. रनजित सिंह देओल, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग पांचे सोबत संघटनेचे पदाधिकारी व सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक यांची पुढील विषयांवर सकारात्मक चर्चा झालेली आहे.
१. नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ प्रकरणांची चौकशी दि.०७.०८.२०२५ च्या शासन निर्णयाद्वारे गठीत केलेल्या विशेष चौकशी समितीकडे वर्ग कराची.
२. विनाचौकशी कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमबाह्य अटक करु नये.
३. शालार्थ प्रकरणी निलंबित झालेले सर्व अधिकारी यांना सेवेत पुनस्थापित करण्यात यावे.
४. अतिरिक्त कार्माच्या ताणाबाबत कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त होणाऱ्या व्ही.सी. चाचत चचर्चा झाली,
वरील सर्व मागण्यांबाबत मा. मंत्री महोदय व मा. प्रधान सचिव महोदय यांनी ठोस आश्वासन संघटना प्रतिनिधी यांचेसोबत आज रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलेले आहे. संघटनेच्या सर्व न्याय मागण्यांबायत सकारात्मक विचार केला जाईल संघटनेच्या मागण्यांचे निवेदनाबाबत पोलीस विभागाला शासन स्तरावरुन कळविण्यात येणार आहे. कोणत्याही निरपराध अधिकारी व कर्मचारी यांच्यावर चुकीची कारवाई होणार नाही, अशा प्रकारचे आश्वासन मा. मंत्री महोदय व मा. प्रधान सचिव महोदय यांनी दिलेले आहे. त्यामुळे संघटनेचे दि.०८.०८.२०२५ पासून सुरु असलेले सध्याचे बेमुदत सामुहिक रजा आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे.
यापुढे अशा प्रकारची विनाचीकशी नियमबाह्य पध्दतीने अटक झाल्यास स्थगित केरलेले आंदोलन कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा सुरु केले जाईल, त्यामुळे सर्व शिक्षणसेवा राजपत्रित अधिकारी व कर्मचारी यांनी बुधवार दि.१३.०८.२०२५ पासून पूर्ववत कामावर रुजू व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संपाच्या वतीने करण्यात येत आहे.
संघटनेचे हे ऐतिहासिक आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्या राजपत्रित अधिकारी महासंघ, अराजपत्रित अधिकारी कर्मचारी संघटना, विस्तार अधिकारी संघटना, केंद्रप्रमुख संघटना, शिक्षक-शिक्षकेतर संघटना, सर्व मा. लोकप्रतिनिधी, अशा विविध संघटनांचे सहकार्य व मार्गदर्शन तसेच मा.श्री. सच्चिद्रप्रताप सिंह, आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य व वरिष्ठ अधिकारी मान्यवरांचे, सर्व पदाधिकारी व सन्माननीय सदस्यांचे तसेच प्रसार माध्यमांचे संघटनेचे अध्यक्ष शेषराव वडे. रविंद्र पाणी कार्याध्यक्ष श्रीमती सरोज जगताप सरचिटणीसडॉ. ज्योती परिहार,. समरजीत पाटील कार्यालयीन सचिव यांनी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त केलेत.
Tags:
शैक्षणिक