नंदुरबार जिल्ह्य़ात 12 इयत्तेत मुलिंनी मारली बाजी.................................... जिल्ह्याचा निकाल 95.91%.................

        नवापूर  सत्यप्रकाश न्युज 
 आज नाशिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12 वी चा निकाल जाहीर झाला कालपासून परीक्षार्थीना निकालाची प्रतिक्षा होती आज 
बा रावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात नंदुरबार जिल्ह्य़ाचा  निकाल 95.91 टक्के लागला आहे. यंदादेखील अपेक्षेप्रमाणे मुलां पेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. 15 हजार 669 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल 97.24 टक्के नंदुरबार तर कमी निकाल 93.36 टक्के निकाल अक्कलकुव्याच्या लागलेला आहे.
इयत्ता 12 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन पद्धतीने लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्याच्या निकाल 95.91 टक्के लागला आहे. मार्च- एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत 16 हजार 435 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 16 हजार 336 परीक्षेसाठी प्रविष्ट झाले.त्यात 9 हजार 027 मुले तर 5 हजार 309 मुलींच्या सहभाग असून, निकालात 8 हजार 627 मुले तर 7 हजार 42 मुली असे 15 हजार 669 परीक्षार्थी पास झाले.

Post a Comment

Previous Post Next Post