येथील श्रीमती प्रताबबा अभेसिंग सोढा सार्वजनिक मराठी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा उपमुख्याध्यापक पदी नारायण मराठे यांची नियुक्ती झाली.
नारायण मराठे हे हिंदी विषयात एम.ए.बी.एड. असून सोबत गीत व नृत्यात अलौकिक प्राप्त असून विद्यार्थामध्ये अत्यंत आदर व सन्मान असलेले उल्लेखनीय व्यक्तिमत्व आहे.
नारायण मराठे यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळेत तर माध्यमिक शिक्षण सार्वजनिक मराठी हायस्कूल मध्ये झाले आहे तर उच्च माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी हायस्कुल नवापूर, व महाविद्यालयीन शिक्षण कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नवापूर येथे तर शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणशास्त्र महाविद्यालय नंदुरबार येथे पूर्ण केले.
आपल्या शैक्षणिक जीवन अत्यंत परिश्रम व मेहनती पार पाडणाऱ्या ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत सेवा करण्याची संधी मिळाल्याने , आज उपमुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याने मराठे परिवार ,व मित्र परिवारात आज आनंदाची लाट आली आहे.
नारायण मराठे यांची नियुक्ती संस्थाध्यक्ष व उद्योगपती विपीनभाई चोखावाला यांनी केली असून सदर नियुक्ती बद्दल संस्थाध्यक्ष विपीनभाई चोखावाला,कोषाध्यक्ष सौ.शितलबेन वाणी/चोखावाला ,उपाध्यक्ष शिरिषभाई शहा,सचिव जितूभाई देसाई, कोषाध्यक्ष सतिषभाई शहा,सहसचिव सोएबभाई मांदा ,महाविद्यालयीन गुरू बी.पी.जाधव ,मुख्याध्यापक मिलिंद वाघ, महाविद्यालयीन मित्र सौरभ पटेल, नवसारी, माजी नगरसेवक अजय पाटील, राजधर जाधव, विजय सोनवणे ,धडगाव, प्रा.डाॅ.अशोक मराठे, भरत सैदाणे, उमेश राणा, निलेश पाटील, नायब तहसिलदार रिनेश गावीत, प्रविण साळुंखे,पत्रकार प्रकाश खैरनार, हरिष तांबोळी, पल्लवी शाह, मुंबई भावना अग्रवाल, शहादा, ज्योती अहिरे मुंबई आशा सैन आदिंनी अभिनंदन केले असून सून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात. तर आज गुरुपौर्णिमेचा दिवशी लाडक्या शिक्षकाची उपमुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल विदयार्थाचा चेहर्यावर उत्साह व आनंद दिसत आहे.