दोंडाईचा येथे संतशिरोमणी नामदेव महाराजांना संजीवनी सभाधी सोहळ्या निमित्त अभिवादन ..........

दोंडाईचा सत्यप्रकाश न्युज 
  येथील  शिंपी समाजातर्फे संत नामदेव महाराज याचा ६७२ वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी पालखी मिरवणूक समाज मंगल कार्यालयापासून भजनांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून निघून परत समाजाच्या जागेवर आली. स्थानिक अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी महाराजांच्या प्रतिमेची सपत्नीक पूजा केली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. शांताराम पवार सर होते. मंगलकार्यालयाच्या बांधकाम परिपूर्तीसाठी समाज बांधवांनी सढळ हस्ते देणग्या दिल्या. 
    नंतर नवयुवक मंडळातर्फे समाजातील इ.१ ते १२ वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तालुका महिला आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. 
   नंतर संपूर्ण समाज माऊलीने महाप्रसादाचा लाभ घेतला. 
 रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post