येथील क्षत्रिय अहिर शिंपी समाज मंडळ,श्रीरामपूर यांचे वतीने श्रीरामपूर येथे श्री संत नामदेव महाराज मंदिरामध्ये श्री संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या ६७२ व्या "संजीवन समाधी सोहळ्याचे" भव्य आयोजन करण्यात आले होते.
श्रीरामपूर येथील, संत नामदेव महाराज मंदिराच्या मंदिर निर्माणामध्ये आपलं भरीव योगदान देणाऱ्या, श्री गणेश खैरनार व कुटुंबीय तसेच श्रीरामपूर शिंपी समाजाचे अध्यक्ष नंदकुमार खैरनार,श्री सुहास शिरसाठ,श्री श्याम सोनवणे, श्री संदीप बागुल, श्री हरिदास निकुंभ, श्री तुषार शिंपी, श्री निलेश खैरनार, श्री रवींद्र सनानसे,
श्री.संजय खैरनार यांनी परिश्रम घेऊन सदरचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.
याप्रसंगी प्रवरा मेडिकल ट्रस्ट च्या विद्यमाने समाजातील गरजू व्यक्तींसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोपरगाव येथील करसल्लागार श्री नितीन डोंगरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हाध्यक्ष श्री किरण तरटे तसेच जिल्हा अध्यक्ष श्री विजय शिपी व्यासपीठावर उपस्थित होते
याप्रसंगी ह.भ.प. श्री छगन महाराज खडके यांच्या सुश्राव्य प्रवचनाचा सर्वांनी लाभ घेतला
या संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्रीरामपूर तालुक्यासोबतच, लोणी, राहाता, कोपरगाव येथील समाज बांधव उपस्थित होते.सौ. सारिका बागुलसौ.नीलिमा जगदाळे सौ.ज्योती सोनवणे सौ.सुवर्णा कापुरे,सौ.दीपाली खैरनार,सौ.समिधा जगताप,सौ.अमृता बागुल,सौ.सुमनताई निकुंभ,सौ.रमनबाई मांडगे,सौ.मंजुषा शिंपी
याच बरोबर समाजातील महिलांची मोठी उपस्थिती होती.
या संजीवन सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने संत नामदेव महाराजांना अभिवादन करण्यासाठि श्रीरामपूर येथील महिला नगराध्यक्षा तसेच श्री साईबाबा संस्थान शिर्डी च्या महिला विश्वस्त अनुराधाताई आदिक, विश्वस्त श्री सचिन गुजर,
श्री करण दादा ससाने,
श्री सिद्धार्थ मुरकुटे, मध्य.संस्थेचे पदाधिकारी श्री राजेंद्र सोनवणे यांनी उपस्थित राहून मान्यवरांचा यथोचित सत्कार केला.
श्री राजेंद्र व सौ संगीता निकुंभ यांचे कडून सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
धन्यवाद!!!!!!👌💐💐
ReplyDelete