संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 727 व्या पुण्यतिथीनिमित्त नवापूर येथील माळी समाज बांधवांकडून अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र माळी महासंघ नवापूर च्या वतीने नवापूर शहरात संत सावता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन साईनगरी परिसरात केंद्रप्रमुख किशोर रायते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्य अर्पण करण्यात आले. संत सावता माळी हे खरे कर्मयोगी महापुरुष व संत आहेत. यांनी आपल्या कर्मातून देव बघितला त्याचप्रमाणे आपणही आपल्या कर्मातून परमेश्वराची प्राप्ती करता येईल असे प्रतिपादन मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नहिरे तर आभार कल्पेश थेटे यांनी मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख श्री किशोर रायते,आश्रम शाळा पांगराणचे मुख्याध्यापक श्री. दिनेश बिरारीस सर,जिल्हा परिषद लक्कडकोट शाळेचे मुख्याध्यापक श्री.भगवान सोनवणे सर , राजधर जाधव, चंद्रकांत फराटे,सुदाम बोरसे, विजय घरटे,सुनिल घरटे,कैलास घरटे, हेमंत कुवर, सुनिल बेहेरे, नितीन पाटील,कल्पेश थेटे,सुनिल नहिरे,शांताराम जाधव,योगेश महाले,सुनंदा रायते, स्वाती फराटे,ललिता घरटे, जाधव मॅडम,वर्षा पगारे यांनी प्रयत्न केले.