वापी शिंपी समाजातर्फे संत नामदेव महाराज संजीवन सोहळा संपन्न........

            वापी - सत्यप्रकाश न्युज 
     येथील श्री क्षत्रिय आहिर शिंपी समाजातर्फे समाजाचे अराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा दिनानिमित्त संत नामदेव महाराजांना अभिवादन करण्यात आले.
   वापी येथील हाॅटेल अतिथी मध्ये आयोजित कार्यक्रमात वापी सह दिव दमण,उमरगांव येथील समाज बांधवांनी आपला सहभाग नोंदवून कार्यक्रम घडवून आणला.
     या समयी संत नामदेव महाराज यांचे प्रतिमापूजन करून आरती व भजन करण्यात आली तदनंतर गुणवंत व यशवंत विद्यार्थाचा गुणगौरव करून त्यांचा उत्साह वाढवला.
     कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सतीश ईसइ, सौ.भारती शिंपी,एकनाथ शिंपी,हरिष शिंपी आदिंनी परिश्रम केलेत. 
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख चव्हाण यांनी केले यावेळी समाजातील  महिलासह बालगोपालांची लक्षणीय उपस्थिती होती.सुरूची भोजनाचा अस्वाद घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post