शहरात लोकांना बसण्यासाठी बेंच (बाक) नव्हते हा विचार करुन लोकसहभागातून नवापुर शहरात बेंचं ठेवण्याच्या अभियानाची सुरुवात आज पासुन चार वर्षांपूर्वी सुरू झाली संयोजन समितीचे सुधीर निकम हरीश पाटील, अजय पाटील नईम शेख ,किरण टिभे यांच्या संकल्पनेतून आज नवापूर शहरामध्ये विविध भागांमध्ये साडेचार ते पाच लाखाचे बेंच नवापूर च्या कॉलेज रोड,वनिता विद्यालय, श्री स्वामी समर्थ मंदिर,नाना नानी पार्क,नवीन महादेव मंदिर, जगन्नाथ महादेव मंदिर अशा विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहे. आज मार्च संस्थेच्या वनिता विद्यालया तर्फे कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले मार्च शिक्षण संस्था संचालित आदर्श प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, पालक आणि अभ्यागतांना बसण्याची सुविधा व्हावी यासाठी नगरसेवक तथा विरोधीपक्ष गटनेता नरेंद्र नगराळे, पंचायत समिती सदस्य राजेश गावीत सनदी लेखापाल वतनभाई अग्रवाल, नाभिक हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम यांनी सामाजिक बांधिलकी जपत औदार्यपणे बाक दिलीत
.त्यांच्या दातृत्व आणि औदर्याला प्रतिसाद म्हणून त्यांना संस्थेचे मानद सचिव अनील पाटील यांनी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरला वसावे, मानद खजिनदार भरत पाटील संचालिका सौ.संगीता पाटील,संचालक चेतनकुमार पाटील,विनयकुमार वसावे, मुख्याध्यापिका सौ.एल.के.पाटील, मुख्याध्यापक मनोज पाटील,पर्यवेक्षक सी. बी.बेंद्रे शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते