नवापूर सत्यप्रकाश न्यूज
श्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर आयोजित शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील अभ्यासक्रमात असलेले योग प्रात्यक्षिक या उपक्रमांतर्गत एकदिवसीय योगासन प्राणायाम व ध्यान धारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लता मोरे उपस्थित होत्या. याप्रसंगी प्रत्यक्ष योगासन व प्राणायाम ची शास्त्रोक्त माहिती व योगासनाचे प्रात्यक्षीक योग शिक्षक प्रा डॉ पुष्पा पाटील आणि प्रा डॉ नितीनकुमार माळी यांनी केले. नियमित योगासन व प्राणायाम केल्यास आपण निरोगी राहून आपले शरीर लवचिक राहते व दिवसभर उत्साह निर्माण होतो म्हणून योगासन आणि प्राणायाम हे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संजय अहिरे यांनी तर आभार प्रा फिलिप गावित यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.