नवापूर सत्यप्रकाश न्यूज
नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित दि एन डी एन्ड एम वाय सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच जे शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर द्वारा आयोजित भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त एक सलाम देश के नाम कार्यक्रमांतर्गत शालेय स्तरावर नृत्य स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. आज दिनांक २३-७-२२ रोजी शाळेच्या मध्यवर्ती सभागृहात श्री. एन पी पाटील सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. प्रस्तावनेनंतर सरस्वती पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती डॉ. तेजलबेन चोखावाला यांचे स्वागत व सत्कार प्राचार्य श्री संजयकुमार जाधव सर यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. तदनंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती मंगलाबेन सैन,नगरसेविका,नवापूर नगरपरिषद यांचे स्वागत शाळेच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती कमलबेन परीख मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते बारावी वर्गातून एकूण आठ गटांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमात सर्वच विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी उत्तमरीत्या नृत्य प्रदर्शन केले. नृत्य कार्यक्रम झाल्यानंतर लगेच निकाल घोषित करण्यात आला. गट पहिला - इयत्ता पाचवी ते सातवी मधून पहिला क्रमांक भारत की बेटी व द्वितीय क्रमांक विभागून नमा भारतम ग्रुप व लक्ष ग्रुपला देण्यात आला. गट दोन - इयत्ता आठवी ते दहावी मधून पहिला क्रमांक रॉयल ग्रुप तसेच दुसरा क्रमांक इंडियन स्टार ग्रुप त्याच प्रकारे गट तीन - इयत्ता अकरावी व बारावीतून पहिला क्रमांक रॉकस्टार ग्रुपला घोषित करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीमती एच बी बोरसे मॅडम,श्रीमती एस आर पाटील मॅडम व श्री एफ टी मर्चंट सर यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या पाहुण्या नगरसेविका श्रीमती मंगलाबेन सैन यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. अध्यक्षीय भाषणात श्रीमती डॉ.तेजलबेन चोखावाला यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या नृत्याचे कौतुक केले,विविध स्पर्धेचे महत्त्व सांगून प्रोत्साहित केले व मार्गदर्शन केले. कार्यक्रमात कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री आसिफ शेख सर,पर्यवेक्षक श्री फारुख पटेल सर, श्री साकीर शेख सर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री जे बी शेख सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जे व्ही जगताप सर तसेच झेड एफ पिंजारी सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय नृत्य समितीने यशस्वी प्रयत्न केले.