नवापूर-दि.२३ सत्यप्रकाश न्युज
शहरातील अशशिफा हॉस्पिटल जवळील उच्चभृ वस्ती असलेल्या घाची वाडी परिसरात काल मध्यरात्री बनियन धारी चोरांनी प्रवेश करून चोरी करण्याच्या प्रयत्न केला.घराबाहेरील खिडकीची ग्रिल चोरट्यांनी कापली आहे सदर प्रकार हासीम पालावाला यांचा घरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सुमारे चार ते पाच बनियन धारी चोर होते घाचीवाडी भागातील प्रत्येक घरात जाऊन त्यांनी चोरीच्या प्रयत्न केला मात्र कुत्रा भुकल्याने त्यांनी पळ काढला. पूर्ण घाचीवाडी भागातील चोरटे फिरल्याचे सीसीटीव्ही कँमेरात दिसत आहे
याबाबत घाचीवाडी परिसरातील रहिवाशांनी नवापूर पोलिसांना बोलवून सदर माहिती दिली.व तक्रार केली आहे पोलिसांनी आम्ही बघतो असे सांगून पुढील तपास ते करीत आहे. बनियन धारी चोरट्यांच्या सीसीटीव्हीत पाहून रहिवाशांमध्ये भीती व्यक्त होत आहे