सत्यप्रकाश न्यूज
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो.
नाशिक कर सल्लागार असोसिएशन च्या वतीने आज संस्थेच्या कार्यालयामध्ये ध्वजारोहण करून व मानवंदना देऊन हा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने साजरा केला गेला.
याप्रसंगी नाशिक कर सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजेंद्र बकरे,सौ रूपाली राजेंद्र बकरे,त्याचप्रमाणे असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री एस एम सोनवणे सचिव श्री अक्षय सोनजे,
माजी अध्यक्ष श्री प्रदीप क्षत्रिय, असोसिएशनचे पदाधिकारी श्री नितीन फिरोदिया, श्री नितीन डोंगरे,श्री अनिकेत कुलकर्णी, श्री वसंत गीते सर,श्री समाधान अपसुंदेश्री संदीप गाढवे, कु.तेजस्वी सैंदाणे, श्री राहुल नीलकंठ तसेच नॉर्थ महा. टॅक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री अनिलजी चव्हाण उपस्थित होते तसेच असोसिएशन च्या प्रवेश द्वारावर सौ.रुपाली बकरे यांनी सुंदर रांगोळी रेखाटली.
१५ ऑगस्ट या, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, संस्थेचे अध्यक्ष श्री राज बकरे यांनी आजच्या दिवसाचे महत्व, त्यांच्या प्रास्ताविकातून, विषद केले.
अतिशय प्रसन्न वातावरणात आजचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा संपन्न झाला
Tags:
अर्थविषयक