वंदे मातरम, भारत माता की जय घोषात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा राष्ट्रध्वजाला नवापूर वासियांनी दिली सलामी........
नवापूर-सत्यप्रकाश न्यूज
येथील शहरात देशाचा अमृतमहोत्सवानिमित्त वंदे मातरम, भारत माता की जय या जय घोषात शहरवासियांनी व तालुक्यातील नागरिकांनी आपल्या तिरंगा ला ठिकठिकाणी उपस्थित राहून सलामी देऊन या अमृतमहोत्सवात सहभाग नोंदविला.
देशाचा 75 स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानासह विविध उपक्रमात देशवासियांनी सहभाग घेतला त्यात नवापूर शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्य
उत्साहात सहभाग घेतला तालुक्यचे
प्रमुख तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना शहरात आवाहन केल्याप्रमाणे घरोघरी उभा असलेल्या तिरंग्याने शहरात आनंदि व उत्साहाचे वातावरण होते. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील मुख्य ध्वजारोहण तहसिलदार मंदार कुलकर्णी यांचे हस्ते पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ उपपोलीस निरीक्षक अशोक मोकल यांचा सह उपस्थित पोलीस बांधवांचा सलामीने तिरग्याला सलामी देण्यात आली यावेळी आ.शिरिषकुमार नाईक, माजी केंद्रीय मंत्री दादासाहेब माणिकराव गावित, नगराध्यक्षा सौ.हेमलताताई पाटील, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी,बालविकास अधिकारी संजय कोंडार, पालिका मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर सह शहरातील प्रतिष्ठीत नागरिक शालेय विद्यार्थ्यांसह बाल,गोपाल व महिला वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सरदार चौकात पालिकेद्वारा आयोजित सार्वजनिक ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ.हेमलताताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळेस मुख्याधिकारी स्वप्नील मुधलवाडकर सह शहरातील नगरसेवक, पालिका कर्मचाऱ्यांसह शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवापूर येथील कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात ध्वजारोहण संस्थेचे कार्याध्यक्ष व आ. शिरिषकुमार नाईक. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळेस तानाजी वळवी आरीफ बलेसरिया
. अजय पाटील जी. के. पठाण,राजुभाई अग्रवाल,श्रीमती हेमलता पाटील
डॉ. ए. जी. जयास्वल,डॉ. सौ. लता सुरवाडे
प्रा.चंद्रकांत शेटे,प्रा. वाय. जी. भदाने
महावितरण कार्यालयात ध्वजारोहण करतांना अभि.हेमंत बनसोड, अभि राजपूत अभि राम गौरकर,अभि अविनाश पदमेरे, अभि अक्षय निकम, स्टाफ शरद कोकणी, वळवी, शिलेश, कांबळे, विश्वास, सावकारे, पवार, शंकर साठे व इतर कर्मचारी. तालुक्यातील वासरवेल जि.प.शाळेत अमृतमहोत्सवानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळेस मुख्याध्यापक भानुदास रामोळे ,ताई गावित सह गावातील प्रतिष्ठीत नागरिक व विद्यार्थ्यांसह पालकांनी सलामी दिली.
Tags:
राष्ट्रीय