जिल्हाधिकारी कार्यालयात ‘समुह राष्ट्रगीत गायन’ कार्यक्रम संपन्न
नंदुरबार- सत्यप्रकाश न्युज
नंदुरबार- सत्यप्रकाश न्युज
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवातंर्गत समूह राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात संपन्न झाला. यावेळी प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामुहीकरित्या एकाच वेळी राष्ट्रगीताचे गायन केले. या समुह राष्ट्रगीत गायन कार्यक्रमास जिल्हाधिकारी मनीषा खत्री, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, कल्पना निळ-ठुंबे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, तहसिलदार उल्हास देवरे, नायब तहसिलदार रामजी राठोड तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
राष्ट्रीय