नवापूर, सत्यप्रकाश न्युज
सटाण्याहून जुनागडकडे जाणारी खासगी बस (जीजे ०३, डब्ल्यू ९६२७) चरणमाळ (ता. नवापूर, जि. नंदुरबार) घाटात कोसळून चिमुकलीसह सहबसचालकाचा मृत्यू झाला. इतर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नवापूर उपजिल्हा रुग्णालय उपचार करण्यात आले असून, काही जखमींना गुजरातकडे नेण्यात आले. शनिवारी (ता. १०) रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, जखमींमध्ये बागलाणमधील ३३ मजूर, प्रवाशांचा समावेश आहे. ही खासगी वाहतूक करणारी
चरणमाळ घाटात खासगी बस कोसळली; दोन ठार पंधरा गंभीर जखमींमध्ये ३३ जण बागलाणमधील बस चरणमाळ घाटात तीव्र उतारावर असताना गाडीचा ब्रेक न लागल्यामुळे उलटी झाली. यामुळे चालकासह प्रवासी दाबले गेले. नवापूर पोलिस ठाण्याचे पथक व स्थानिक नागरिकांनी जखमींना गाडीतून बाहेर काढले. १०८ रुग्णवाहिकेद्वारे नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बोकळझरच्या पोलिसपाटलांनी अपघातग्रस्तांची मदत केली. नवापूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत गावातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी धावले. जखमींना वेळेत उपचारासाठी १०८ रुग्णवाहिका वेळेत पोचून जखमींना रुग्णालयात दाखल केले. सहबसचालक अफजल मुसाभाई सोडा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात १८ महिन्यांची अश्विनी सुरेश माळी ही चिमुकली मृत्युमुखी पडली.
बस सरळ दरीमध्ये चरणमाळ घाटाच्या वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस वळण न घेता सरळ दरीत कोसळली. त्यात बसखाली अडकलेल्या चालकाला मध्यरात्रीपर्यंत बाहेर काढण्याचे काम पोलिस निरीक्षक नीलेश वाघ व बोकळझरचे पोलिसपाटील, पोलिस कर्मचारी, ग्रामस्थांनी केले. मात्र चालकाला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच त्याने प्राण सोडला. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी आल्या. मुसळधार पावसात रस्त्याचा अंदाज न आल्याने ही बस उलटल्याची
प्राथमिक माहिती आहे. प्रवासी तसेच मजूर मिळून बसमधून ५५ जण प्रवास करीत होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. राहुल सोनवणे, चालक विनोद देसाई यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमींवर उपचार केले.
अपघातातील जखमी
पूर्वा शरद जगताप (ताहाराबाद), सुरेखा जीवन माळी (ताहाराबाद), राजन सुनील सोनवणे (सटाणा), संगीता सुरेश माळी (ताहाराबाद), नामू उमेश गवळी (ताहाराबाद), वैशाली राजू सोनवणे (तरसाळी, ता. बागलाण), सुरेखा दशरथ वाघ (सटाणा), मीना भुरा सोनवणे, विमल भीमराज पवार (सौंदाणे, ता. बागलाण), राजीव मधुकर खैरनार (करंजाड, ता. बागलाण), संजय हसमुख पाघाड्या (सुरत), अनिता उमेश गवळी (ताहाराबाद), सहाय्यक,राजीव देवीदास सोनवणे (सोमपूर, ता. बागलाण), कस्तुराबाई सुनील सोनवणे (ता. बागलाण), शुभम शरद जगताप (निताणे, ता. बागलाण), संगीता शरद जगताप (निताणे, ता. बागलाण), दीपक जिंदा मोरे (चौंधाणे, ता. बागलाण), त्र्यंबक हरीश सिंघवें (चौंधाणे, ता. बागलाण) शीतल युवराज जगताप (निताणे ता. बागलाण), कृष्णा सोमनाथ सोनवणे (निताणे, ता. बागलाण), श्रावण सुखदेव नवांडे (सटाणा), पोपट अनिल पवार (सटाणा), दशरथ मोठा वाघ (तरसाळी, ता. बागलाण), कैलास पवार (दसाने), पूनम बापू सोनवणे (केरसाने, ता. बागलाण), विशाल दौलत पवार (सटाणा), राणी श्रावण बोरसे (निताणे, ता. बागलाण), वैशाली दिलीप गवळी (सटाणा), भीमराव रामचंद्र पवार (डांगसौंदाणे), महेंद्र दादाभाई वाघ्या (सुरत), अश्विनी सुरेश माळी (निताणे, ता. बागलाण).
Tags:
अपघात